राज्यातील 271 ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगूल वाजला; आजपासून आचारसंहिता लागू

राज्य निवडणूक आयोगानं ग्रामपंचायत निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली आहे. पावसाचे प्रमाण कमी असलेल्या 62 तालुक्यांमधील 271 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 4 ऑगस्ट 2022 रोजी मतदान होणार आहे

Updated: Jun 29, 2022, 04:29 PM IST
राज्यातील 271 ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगूल वाजला; आजपासून आचारसंहिता लागू title=

मुंबई : राज्य निवडणूक आयोगानं ग्रामपंचायत निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली आहे. पावसाचे प्रमाण कमी असलेल्या 62 तालुक्यांमधील 271 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 4 ऑगस्ट 2022 रोजी मतदान होणार आहे.  राज्य निवडणूक  आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी ही माहिती दिली आहे. 

- 4 ऑगस्टला 271 ग्रामपंचायतींच्या निवडणुका

- राज्य निवडणूक आयोगाची मोठी घोषणा 

- 5 ऑगस्टला ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी

- 62 तालुक्यांमधील ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर 

राज्यात सध्या राजकीय वातावरण तापले असताना राज्य निवडणूक आयोगाने 62 तालुक्यांमधील 271 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जारी केली आहे. या ग्रामपंचायतींसाठी 4 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. राज्य निडवणूक आयोग युपीएस मदान यांनी ही माहिती दिली. त्यामुळे आता ग्रामपंचायतींचेही राजकारण चांगलेच तापणार आहे.