Gram Panchayat Election लक्षवेधी लढत : भाजपला मोठा धक्का, सत्ताधारी सरपंच 1 मताने पराभूत

Gram Panchayat Election Result 2022 : कोल्हापूर दक्षिणमधील पहिला निकाल हाती आला आणि भाजपला मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळाले. (Maharashtra Political News)  

Updated: Dec 20, 2022, 12:07 PM IST
Gram Panchayat Election लक्षवेधी लढत : भाजपला मोठा धक्का, सत्ताधारी सरपंच 1 मताने पराभूत title=

Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 : कोल्हापूर दक्षिणमधील पहिला निकाल हाती आला आणि भाजपला मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळाले. (Maharashtra Political News) आजरा तालुक्यात वडकशिवाले ग्रामपंचायत निवडणुकीत विद्यमान सरपंच संतोष बेलवाडे यांचा एक मताने पराभव झाला आहे. हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. (Gram Panchayat Election Result in Marathi) या ठिकाणी राष्ट्रवादीचे जयवत शिंदे हे केवळ  1 मताने विजयी झाले आहेत. शिंदे यांना 168 मते तर भाजपचे विद्यमान सरपंच संतोष बेलवाडे याना 167 मते मिळालीत. केवळ एका मताने सत्तापरिवर्तन पाहायला मिळाले आहे. सत्ताधारी सरपंच यांचा 1 मताने पराभूत झाल्याने हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागला आहे. तर दिंडणेर्ली गावात स्थानिक आघाडीची सत्ता आली आहे. 

ग्रामपंचायत निवडणूक निकाल LIVE : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे आणि भाजपची सत्ता

कोल्हापुरात या गटाला धक्का आणि सत्तांतर

कोल्हापूर ग्रामपंचायत निवडणुकीत हातकणंगले तालुक्यातील रूकडी गावात शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांच्या चुलत भावाचा पराभव झाला आहे. माजी उपसरपंच मोहन माने यांचा पराभव झाला आहे. रुकडी गावात सत्ता राखण्यात खासदार धैर्यशील माने यांना यश, पण चुलत भावाचा पराभव झाला आहे. तर दुसरीकडे शिरोली गावात सत्तांतर पाहायला मिळाले आहे.

शिरोली गावात सत्तांतर

महाडिक गटाने काँग्रेस आमदार सतेज पाटील गटाचा केला दारुण पराभव झाला आहे. शिरोली गावात सतेज पाटील गटाची असणारी  सत्ता उलथवून लावण्यात महाडिक यांना यश आले आहे. महाडिक गटाच्या पद्मजा करपे याची सरपंच पदी निवड झाली असून 18 पैकी 17 जागा पटकावीत महाडिक गटाने सतेज पाटील गटाचा पराभव केला आहे.  गांधीनगर भाजपची सत्ता कायम राखण्यात महाडिक गटाला यश आले आहे. आमदार सतेज पाटील यांचा सत्तांतराचा प्रयत्न अयशस्वी ठरल्याने सतेज पाटील गटाला धक्का बसला आहे.

शिंदे गटाने खाते खोललं 

 कोल्हापूरमधील राधानगरी तालुक्यातदेखील शिंदे गटाने खाते खोललं आहे. हसणे गावामध्ये शिंदे गटाची सत्ता  आली आहे. आजरा तालुक्यातील सरबळवाडी राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. सरपंच उमेदवार सुनीता कांबळे विजयी झाल्यात तर पन्हाळा तालुक्यात तांदुळवाडी ग्रामपंचायत सरपंच  पदाच्या निवडणुकीत ठाकरे गटाच्या सुनीता सरदार पाटील सरपंचपदी विजयी झाल्यात. वेतवडे ग्रामपंचायतीवर स्थानिक आघाडीची सत्ता आली आहे. सरपंच पदी रेखा पोवार विजयी झाल्या आहेत. आजरा तालुक्यातील पहिला निकाल भाजपच्या बाजूने लागला आहे. चितळे ग्रामपंचायतवर भाजपचा झेंडा. सरपंच उमेदवार रत्नप्रभा भुतुले विजयी झाल्या आहेत.