Nashik News: वीकेंडला हरिहर किल्ल्यावर जाण्याचा प्लॅन करताय? सो सॉरी... आधी ही बातमी वाचा!

Harihar Fort, Dugarwadi Waterfall: वीकेंडला हरिहरगड (Harihar Fort) तसेच दुगारवाडी धबधब्यावर जाणाऱ्या पर्यटकांना दुपारी 3 वाजेनंतर प्रवेशबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.

Updated: Jul 22, 2023, 06:59 PM IST
Nashik News: वीकेंडला हरिहर किल्ल्यावर जाण्याचा प्लॅन करताय? सो सॉरी... आधी ही बातमी वाचा! title=
Harihar Fort, Dugarwadi

Harihar Fort, Nashik News: वीकेंड आला की सर्वांची धावपळ सुरू होते, ती गडकिल्ल्यांकडे... पावसाळ्यात अनेकजण ट्रेकिंगसाठी उत्सुक असतात. त्यामुळे मागील काही दिवसांपासून गडकिल्ल्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळत आहे. अशातच आता नाशिकमधून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नाशिकमधील सर्वांचा आवडता ट्रेक म्हणजे हरिहर किल्ला. अशातच दुगारवाडीसह हरिहर (Harihar Fort) किल्ल्यावर वीकेंडला जाण्यासाठी वेळमर्यादा ठरवण्यात आली आहे. वनविभागाने (Nashik forest Dept) महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याने अनेकांचा ट्रेकर्सचा हिरमोड झालाय.

नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला नाही. तरी देखील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी वनविभागाने मोठा निर्णय घेतला आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी वनविभाग अलर्ट मोडवर आहे. वीकेंडला हरिहरगड (Harihar Fort) तसेच दुगारवाडी धबधब्यावर जाणाऱ्या पर्यटकांना दुपारी 3 वाजेनंतर प्रवेशबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर धोकादायक ठिकाणी फोटोसेशन, सेल्फीला मनाई करण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं वनविभागाकडून सांगण्यात आलंय.

दरम्यान, चार दिवसांपूर्वी दुगारवाडी धबधब्यात तरुण वाहून गेल्याची घटना घडली होती. त्यानंतर वनविभाग पुन्हा एकदा अलर्ट झाल्याचं दिसून आलंय. मागील वर्षी अंकाई किल्यावर (Ankai fort) गेलेल्या दोन मित्रांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तर  दुगारवाडी (Dugarwadi waterfall) धबधबा परिसरात 21 पर्यटक अडकले होते, त्यातील एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यंदाही मोठ्या प्रमाणात पर्यटकांचा ओघ हरिहर आणि दुगारवाडी धबधब्याकडे वाढत चाललाय. त्यामुळे आता प्रशासन योग्य ती काळजी घेताना दिसतंय.

आणखी वाचा - Weather Update: महाराष्ट्रात पुढील 5 दिवस मुसळधार पाऊस; पुणे, मुंबईसह 'या' जिल्ह्यांना IMD चा इशारा

राज्यात सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस (Heavy Rainfall in Maharastra) सुरू असून आजही पावसाचा जोर कायम असणार आहे. आठवड्याभराच्या कामानंतर नागरिक सुट्टीची मजा घेण्यासाठी बाहेर पडतात. पण आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी लोहगड, सिंहगड आणि इतर किल्ल्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.