भारतीय बनावटीच्या दोन नौका रायगडमध्ये दाखल

रायगड जिल्ह्यातील मुरुड आगरदांडामध्ये भारतीय तटरक्षक दलाच्या तळावर सी-433 आणि सी-434 या भारतीय बनावटीच्या सशस्त्र नौका दाखल झाल्यात.

Updated: Sep 20, 2017, 09:47 PM IST
भारतीय बनावटीच्या दोन नौका रायगडमध्ये दाखल  title=

रायगड : रायगड जिल्ह्यातील मुरुड आगरदांडामध्ये भारतीय तटरक्षक दलाच्या तळावर सी-433 आणि सी-434 या भारतीय बनावटीच्या सशस्त्र नौका दाखल झाल्यात. त्यांचा भारतीय तटरक्षक दलात समावेश करण्यात आलाय. अलिबाग तालुक्यातील मांडवा ते बागमांडला या रायगडच्या समुद्र किना-याच्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस त्या काम करतील.

या नौकांची लांबी 27.42 मीटर असून याचं वजन 136 टन आहे. तसंच अरबी समुद्रात ताशी ४५ नॉटीकल्स माईल इतक्या वेगानं चालणा-या या नौका आहेत. नौकांमध्ये 12.7 MMच्या मशीन गन्स आहेत.

त्याचबरोबर इतर शस्त्रांचाही समावेश करण्यात आला असून यासाठी विशेष प्रशिक्षण घेतलेले एकूण 12 क्रूमेम्बर्स सी-433 या नौकेवर आहेत. तटरक्षक दलातील या दोन नौकांमुळे आता रायगडच्या सागरी सुरक्षेमध्ये चांगलीच वाढ झालीय.