Crime News : रागाच्या भरात नको ते करुन बसला... सासूसमोरच जावयाचे पत्नीसोबत भयानक कृत्य

Crime News : रागाच्या भरात सासरवाडीत जाऊन गोंधळ घातला. सासू समोरच या जावयाने पत्नीवर हल्ला केला. 

Updated: Apr 13, 2023, 11:31 PM IST
Crime News : रागाच्या भरात नको ते करुन बसला... सासूसमोरच जावयाचे पत्नीसोबत भयानक कृत्य title=

सोनू भिडे, झी मीडिया, नाशिक: कधी कधी रागाच्या भरात माणूस काय करतो हे त्याचं त्यालाच कळत नाही. असाच एक धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये घडला आहे. कामासाठी बाहेरगावी जाण्यास पत्नीने नकार दिला. याचा पतीला राग आल्याने त्याने कोयत्याने पत्नीवर वार केले. यात त्याच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. नाशिकमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.   

सासू सासरे आणि सून यांचे वाद प्रत्येक घरात होत असतात. यावरून पती आणि पत्नीचे (Husband - Wife) नेहमी भांडण सुद्धा होत असते. मात्र नाशिक जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. कामासाठी बाहेरगावी जाण्याला पत्नीने नकार दिल्याने पतीने पत्नीची हत्या केली आहे. या प्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडलं नेमकं

ललिता म्हाळू गांगुर्डे (वय २२) आणि पती म्हाळू गोरख गांगुर्डे (वय २३) हे नाशिक जिल्ह्यातील (Nashik Dist.)  जायखेडा तालुक्यात असलेल्या कऱ्हे याठिकाणी वास्तव्यास आहे. ललिता काही दिवसांपूर्वी माहेरी आली. सोमवारी ललिता आई गीता राजेंद्र पगारे (रा. देवळाने) सोबत शेतमजुरी करण्यासाठी गेली. सायंकाळी काम संपल्यानंतर ललिता घरी परतत असताना तिचा पती म्हाळू तिला वाटेत भेटला. यावेळी दोघांमध्ये बचाचीत झाली आणि म्हाळूने सासू देखत पत्नी ललिता वर कोयत्याने सपासप वार केले यात ललिता गंभीर जखमी झाली. 

या कारणासाठी पत्नीवर कोयत्याने वार 

काम संपल्यानंतर म्हाळू आणि ललिताची भेट झाली. यावेळी म्हाळूने ललिताला आपण कामासाठी बाहेरगावी जाऊ असे सांगितले मात्र पत्नी ललीताने नकार दिल्याने पतीला याचा राग आला आणि या रागाच्या भरात पती म्हाळूने हातात असलेल्या ऊस तोडणीच्या कोयत्याने पत्नीवर सपासप वार केले यात ललिता गंभीर जखमी झाली. ललिताला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत (Death) घोषित केलं. 

पत्नीवर हल्ला करुन फरार

पत्नीवर हल्ला (Attack) केल्यानंतर पती फरार झाला होता. घटनेची माहिती  मिळताच जायखेडा पोलीस ठाण्याचे पथक घटना स्थळी दाखल झाले. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथक रवाना केले. संशयित आरोपी म्हाळू एका डाळींबाच्या शेतात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर परिसरात सापळा रचून (Trap) संशयित म्हाळूला पोलिसांनी ताब्यात (Arrest) घेतल आहे.