Maharashtra Corona | दिलासादायक! राज्यातील रुग्णसंख्येत घट, रिकव्हरी रेटमध्ये वाढ

राज्यातील जनतेसाठी दिलासादायक बातमी आहे.  

Updated: Jul 12, 2021, 07:55 PM IST
Maharashtra Corona | दिलासादायक! राज्यातील रुग्णसंख्येत घट, रिकव्हरी रेटमध्ये वाढ title=

मुंबई : राज्यातील जनतेसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्याची दिवसभराची कोरोना आकडेवारी समोर आली आहे. राज्यात त्यानुसार आज बाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही दुप्पट आहे. त्यामुळे राज्याच्या रिकव्हरी रेटमध्येही काही प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्याही 60 पेक्षा कमी आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांमध्ये 7 हजार 603 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. (in maharashtra today 12 july 7 thousand 603 corona patients found) 

राज्यात आज एकूण 15 हजार 277 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण 59 लाख 27 हजार 756 जण कोरोनामुक्त झाले आहे. यामुळे राज्याचा रिकव्हरी रेटमध्ये 11 जुलेच्या तुलनेत  1.03 टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्याचा आजचा रिकव्हरी रेट हा 96.15 टक्के इतका झाला आहे. जो 11 जुलेला 96.02% इतका होता. 

मृत्यूमध्येही घट 

आज राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. दिवसभरात एकूण 53 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यू दर नियंत्रणात येत असल्याचं म्हटलं जातंय. राज्याचा मृत्यू दर हा 2.04% इतका झालाय.

सध्या राज्यात 5 लाख 82 हजार 476 व्यक्ती होम क्वारटाईनमध्ये आहेत. तर 4 हजार 654  व्यक्ती संस्थातमक विलिगिकरणात आहेत.राज्यातील ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या ही 1 लाख 8 हजार 343 इतकी आहे.

मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या

मुंबईतही आज 500 पेक्षा कमी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दिवसभरात एकूण 478 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 701 जणांनी कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत मुंबईतील एकूण 7 लाख 30 हजार 77 जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट हा 96 टक्के इतका झालाय. मुंबईत एकूण 7 हजार 120 सक्रीय कोरोना रुग्ण आहेत.