पंतप्रधान मोदींच्या बहिणीचा पत्ता कट? हेमंत पाटील यांच्या पत्नीला शिवसेनेकडून लोकसभेची उमेदवारी?

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजेश्री पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. यामुळे भावना गवळी यांचा पत्त कट झाला आहे. 

वनिता कांबळे | Updated: Apr 3, 2024, 07:25 PM IST
पंतप्रधान मोदींच्या बहिणीचा पत्ता कट?  हेमंत पाटील यांच्या पत्नीला शिवसेनेकडून लोकसभेची उमेदवारी? title=

Bhavana Gawali : यवतमाळ वाशिम लोकसभेच्या उमेदवारी मिळावी यासाठी भावना गवळी यांची धडपड सुरु आहे. मात्र, त्यांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरल्याचे दिसत आहे. भावना गवळी यांचा पत्ता कट झाला आहे. यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी भावना गवळी यांच्या ऐवजी खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नीला शिवसेनेकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर होऊ शकते अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. 

भावना गवळी यांना लोकसभेचे तिकीट नाही?

शिदेंच्या शिवसेनेने आपले उमेदवार बदलले आहेत.  हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेनं विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्याऐवजी बाबूराव कदम यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आलां आहे. तर, यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली. यवतमाळ-वाशिम आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांचा अर्ज दाखल करण्यासाठी उद्या सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजीत पवार उपस्थित रहाणार आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राखी बहिण

ED चौकशीच्या फेऱ्यात अडकल्यानंतर भावना गवळी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला. यानतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधल्यामुळे भावना गवळी चांगल्याच चर्चेत आल्या. 

भावना गवळी दोन दिवसांपासून मुंबईमध्ये तळ ठोकून 

यवतमाळ- वाशिमच्या जागेचा महायुतीचा तिढा काही केल्या सुटत नाहीये. शिवसेनेच्या खासदार भावना गवळी या आग्रही आहेत. तर, संजय राठोडही येथून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. उद्या दुस-या टप्प्यातील अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. तिकीट मिळण्यासाठी भावना गवळी दोन दिवसांपासून मुंबईमध्ये तळ ठोकून आहेत. तर, काल त्यांनी वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तर आजही त्या वर्षा निवासस्थानी 9 तासांपासून वेटींगवर आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री भेट घेणार का आणि भावना गवळी उद्या उमेदवारी अर्ज भरणार का याची उत्सुकता वाढली आहे.

भाजपनं एकनाथ शिंदेंचा बळी घेऊ नये - बच्चू कडू यांचा प्रहार

भाजपनं एकनाथ शिंदेंचा बळी घेऊ नये असा प्रहार बच्चू कडूंनी केलाय. भावना गवळींना उमेदवारी कशी मिळेल हे शिंदेंनी पहायला हवं असंही कडूंनी म्हटलंय. बच्चू कडूंच्या वक्तव्याला भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांनी प्रत्युत्तर दिलंय. बच्चू कडूंनी स्वत:च्या पक्षाकडे लक्ष द्यावं असा सल्ला शेलारांनी दिलाय. तर दबावाच्या चर्चा दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाटांनी दिलीय. 

भाजपच्या दबावामुळे उमेदवार बदलले - अंबादास दाणवे यांची टीका

शिवसेनेत, मातोश्रीवर सन्मान मिळत होता तो हेमंत पाटील यांना पचवता आला नाही. शिवसेनेतील स्वातंत्र्य सोडून भाजपची गुलामी पत्करली, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले आहेत. जाहीर झालेली उमेदवारी केवळ भाजपचा दबाव म्हणून बदलावी लागावी, यापेक्षा मोठी नामुष्की काय असावी. असा दबाव… अशी पोस्ट अंबादास दाणवे यांनी सोशल मिडियावर शेअर केली आहे.