प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या गाडीला अपघात

Indurikar Maharaj | सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या कारला जालन्यातील परतूर शहराजवळ अपघात झाला आहे. 

Updated: Apr 14, 2022, 08:25 AM IST
प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या गाडीला अपघात title=

जालना : सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या कारला जालन्यातील परतूर शहराजवळ अपघात झाला आहे. 

राज्यभरात आपल्या कीर्तनांनी प्रसिद्ध असलेले इंदुरीकर महाराज यांच्या कारला अपघात झालाय. परतूर (जालना) तालुक्यातील खांडवीवाडी इथे किर्तनासाठी जात असतांना एका ट्रॅक्टरवर गाडी आदळून हा अपघात झाला. 

अपघातात इंदोरीकर महाराजांना कोणतीही इजा झाली नसून गाडीचा चालक संजय गायकवाड किरकोळ जखमी झाला आहे.