साखर कारखान्यांचा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात, महसूलमंत्र्यांचे आश्वासन

 कारखानदार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात बैठक झाली. एफआरपी आणि दोनशे रुपये देण्याचा तोडगा कोल्हापूर जिल्ह्यात निघाला होता. मात्र ..

Updated: Dec 29, 2017, 02:19 PM IST
साखर कारखान्यांचा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात, महसूलमंत्र्यांचे आश्वासन title=

कोल्हापूर : जिल्ह्यातील कारखानदार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात बैठक झाली. एफआरपी आणि दोनशे रुपये देण्याचा तोडगा कोल्हापूर जिल्ह्यात निघाला होता. मात्र सध्याची परिस्थिती पाहता सरकारने मदत केल्याशिवाय शेतकऱ्यांना पैसे देणे अवघड झाल्याचं मत कारखानदारांनी व्यक्त केलंय.

या संदर्भात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याचं आश्वासन पालकमंत्र्यांनी दिलंय. बफर स्टॉक करून साखरेचे दर वाढले तर यावर तोडगा निघू शकतो असं कारखानदारांनी सुचवलं आहे.

आज पुण्यातील साखर संकुलात यासंदर्भात बैठक होणार असून यामध्ये कारखानदार आपली बाजू मांडणार आहेत. मात्र या प्रश्नावर अंतिम तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री काय निर्णय घेणार याकडं कारखानदार आणि शेतकऱ्यांचं लक्ष असेल.