सोशल मीडियावर इंदुरीकर महाराजांना पाठिंबा

 #isupportindurikar हा हॅशटॅग ट्रेंड 

Updated: Feb 14, 2020, 08:53 AM IST
सोशल मीडियावर इंदुरीकर महाराजांना पाठिंबा title=

 मुंबई : किर्तनकार हभप निवृत्ती इंदुरीकर महाराज सध्या आपल्या पुत्रप्राप्तीच्या व्हिडिओवरून चर्चेत आहे. या व्हिडिओवरून विरोधी मत पाहायला मिळत असताना सोशल मीडियावर इंदुरीकर महाराजांचा ट्रेंड सुरू झाला आहे. यामध्ये अनेक नेटीझन्सनी सोशल मीडियावर इंदुरीकर महाराजांनी सपोर्ट केली आहे. 

या ट्रेंडमध्ये #isupportindurikar असा हॅशटॅग वापरून इंदुरीकर महाराजांना पाठिंबा दिला जात आहे. सोशल मीडियावर आय सपोर्ट इंदुरीकर महाराज हा हॅशटॅग ट्रेंडींग आहे. मराठा क्रांती मोर्चाही महाराजांना सपोर्ट करत आहे.
सोशल मिडीयावर आय सपोर्ट इंदोरीकर महाराज अस सुरु झालय मराठा क्रांती मोर्चा ही महाराजांना सपोर्ट करत असल्याचं दिसून येत आहे. 

 किर्तनकार हभप निवृत्ती इंदुरीकर महाराज यांना राज्य आरोग्य विभागाची नोटीस बजावली आहे. तसेच पुत्रप्राप्तीच्या व्हीडीओप्रकरणी खुलासा करण्याचे आदेशही देण्यात आले आहे.

पुत्रप्राप्तीबाबत अजब विधान केल्यावर इंदुरीकर महाराजांना आरोग्य खात्याची नोटीस आली आहे. मात्र सोशल मीडियावर इंदुरीकर महाराजांना जोरदार पाठिंबा दिला जात आहे. 

किर्तनकार हभप निवृत्ती इंदुरीकर महाराज यांनी कीर्तन करताना वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल अहमदनगरच्या पीसीपीएनडीटी सल्लागार समितीच्यावतीने, नगरचे जिल्हा शल्य चिकित्सक तथा जिल्हा समुचित अधिकारी डॉ. प्रदीप मुरंबीकर यांच्या आदेशानुसार संगमनेर घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक भास्कर भवर यांनी ही नोटीस बजावली आहे.

इंदुरीकर महाराज यांनी ओझर येथे आपल्या कीर्तनात सम तिथीला स्त्री संग झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते असे विधान केले होत. मात्र हे विधान गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात असून पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलाम २२ चे उल्लंघन असल्याचा आरोप याच समितीच्या सदस्याने केला. त्यानुसार  पीसीपीएनडीटी सल्लागार समितीने निवृत्ती इंदुरीकर महाराज यांना नोटीस पाठवून खुलासा मागितला आहे.