ते दसऱ्याचं नाही तर शिमग्याचं भाषण होतं - चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील यांची मराठा आरक्षणावरुन देखील मुख्यमंत्र्यांवर टीका

Updated: Oct 27, 2020, 04:06 PM IST
ते दसऱ्याचं नाही तर शिमग्याचं भाषण होतं - चंद्रकांत पाटील title=

कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ते दसऱ्याचं नाही तर शिमग्याचं भाषण होतं असं देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

त्यांनी म्हटलं की, 'ते दसऱ्याच्या भाषण नव्हतं तर ते शिमग्याचं भाषण होतं. त्यांनी मुख्यमंत्रीपदाची गरिमा राखली नाही. जनतेशी संबधित कुठलेही मुद्दे त्यानी मांडले नाहीत. हम किसीं को टोकेंगे नहीं... हमे टोकेंगे तो हम छोडेंगे नही. सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नाही. सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्यात रस नाही. निर्णय लवकर व्हावेत.. स्थगिती लवकर उठावी असं सरकारला वाटत नाही.'

5 जणांच्या खंडपीठाकडे केस पाठवा अस सरकार म्हणतं. पण पाच जणाचं खंडपीठ हे 50 टक्केच्या वर आरक्षण देता येईल का यासाठी आहे. पूर्णपणे गोंधळ सुरू आहे. सरकारचे कोणीही उपस्थित नव्हते, म्हणून ती केस पेंडिंग ठेवली. तुम्हाला वेळेत देखील जात येत नाही का? सरकारच्या वकिलांमध्ये एकमत नाही. आज मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकार गंभीर नाही, सरकारला आरक्षण देण्यात रस नाही हे आज दिसून आलं. असा आरोप देखील चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

सरकारने स्थगिती नंतर 47 ते 48 दिवसांत जे प्रयत्न केले ते संशयास्पद आहे. सरकार विरोधीपक्षांना सहभागी करून घेत नाही. मी सरकारचा निषेध करतो. दसरा मेळाव्यात बांधील आहोत म्हटल्यावर विषय संपत नाही. सरकारने हे खूप गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. केवळ मराठा समाज नाही तर संपूर्ण महाराष्ट्र वेठीस धरला आहे. वकिलांशी चर्चा केली पाहिजे ती होत नाही. महाराष्ट्र सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे आहे की नाही? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

आता सुप्रीम कोर्टाने एक महिन्याची मुदत दिली. मराठा समाजाला आणखी भीती वाटते. विरोधी पक्षाच्या नेत्यांना बोलवण्याचे केवळ नाटक केलं. 5 जणांच्या खंडपीठाकडे विषय गेला की त्याला खूप वेळ लागणार. वेळ किती लागू द्या मात्र स्थगिती उठवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे होते. शेवटच्या वर्षाची परीक्षा घेण्याची केवळ औपचारिकता पूर्ण करत आहेत. अशोक चव्हाण यांचा राजीनामा घ्यायचा की मुख्यमंत्री यांचा राजीनामा घ्यायचा यांनी विषय संपणार नाही. असं देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

'शाळा कॉलेज कधी सुरू करणार काय माहिती नाही. 1 जानेवारीपासून शैक्षणिक वर्ष सुरू करा अशी मी मगणी करतोय. तुम्ही मुख्यमंत्रीपदाची गरिमा राखली नाही तर तुम्ही इतरांकडून का इच्छा व्यक्त करता.'