जे.डे. हत्याकांड : सबळ पुराव्याअभावी जिग्ना व्होरा निर्दोष

जे.डे. हत्याकांड प्रकरणी जिग्ना व्होराला मुंबई उच्च न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष सोडले 

Updated: Aug 27, 2019, 04:55 PM IST
जे.डे. हत्याकांड : सबळ पुराव्याअभावी जिग्ना व्होरा निर्दोष title=

बागेश्री कानडे, झी मीडिया, मुंबई : जे.डे. हत्याकांड प्रकरणी जिग्ना व्होराला मुंबई उच्च न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष सोडले आहे. जे डे हत्याप्रकरणात जिग्ना व्होरावर माहिती पुरवण्याचा आरोप सीबीआयने केला होता. मात्र सबळ पुरावा सरकारी पक्ष सादर करू न शकल्याने विशेष सत्र न्यायालयाने जिग्नाची निर्दोष ठरवत मुक्तता केली होती. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली होती. त्यावर मंगळवारी उच्च न्यायालयाने जिग्ना व्होरा हिला जेडे हत्याकांडातून निर्दोष सोडण्याच्या सत्र न्यायालयाच्या निर्णयाला कायम ठेवले आहे. 

काय आहे प्रकरण ?

वरिष्ठ पत्रकार जे. डे. यांची ११ जून २०११ रोजी भरदिवसा पवई येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. क्राईम ब्रांचनं 14 दिवसांत प्रकरणाचा छडा लावत 7 आरोपींना अटक केली होती. त्यानंतर 4 आरोपींना अटक करण्यात आली. एका आरोपीला म्हणजेच छोटा राजनला सीबीआयनं अटक केली आहे. क्राईम ब्रांचनं आरोपपत्र दाखल केल्यानंतर प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं. सीबीआयने याप्रकरणी तपासाअंती ५ ऑगस्ट २०१६ रोजी पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर न्यायालयाने ३१ ऑगस्ट २०१६ रोजी आरोपींवर आरोप निश्चित केले होते. सरकारी आणि बचाव पक्षाकडून साक्षी पुरावे नोंदवण्यात आले होते.   

प्रकरणातील आरोपी 

1) सतीश थांगपन उर्फ सतीश काल्या : जेडे  यांच्या हत्येत प्रत्यक्ष सहभाग, खून करण्यासाठी लागणाऱ्या पिस्तूलाने गोळ्या झाडल्या. छोटा राजन याच्याशी संपर्कात राहण्यासाठी आरोपीना आतंराष्ट्रीय सिम कार्ड उपलब्ध करून देणे, हत्येच्या तयारीसाठी माणसं जमविणे, खुनाच्या दिवशी जेडे यांच्यावर पळत ठेवून त्यांचा पाठलाग करणे हे आरोप 

2 ) अनिल भानुदास वाघमोडे : जेडे यांच्यावर गोळी झाडणाऱ्या सतीश काल्या यांच्या संपर्कांत राहून हत्येसाठी मोटारसायकल उपलब्ध करून दिली. खुनासाठी नंदिताल येथून आणले. खुनानंतर छोटा राजन यांच्याकडून पैसे घेतले. खुनाच्या दिवशी सतीश काळ्या सोबत घटनास्थळी हजर.. 

3 ) अभिजित काशिनाथ शिंदे : खुनाच्या दिवशी स्वतः मोटार सायकल चालवीत जेडे यांचा पाठलाग केला. सतीश काळ्या याने जेडे यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर त्याच्याकडील पिस्तूल आपल्या ताब्यात घेऊन निलेश शेडगे या आरोपीस जोगेश्वरी हायवेपर्यंत मोटारसायकल वरून नेले. 

4 ) निलेश शेडगे उर्फ बबलू : गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग, घातस्थळी स्वतः हजर राहून जेडे यांचा पाठलाग केला होता. गुन्ह्यानंतर २५ हजार स्वीकारले. 

5 ) अरुण जनार्दन डाके : ७ जून २०११ रोजी सतीश काळ्या याच्या सांगण्यावरून आरोपी अनिल वाघमोडे यच्य्या सोबत उमाँ पॅलेस बार मुलुंड येथे जाऊन आरोपी विनोद सरानी उर्फ विनोद चेंबूर यास भेटण्यास आलेल्या जे डे यांच्या निवास्थानाच्या परिसरात पाळत ठेवली. या आरोपीच्या मोटारसायकलवर सतीश काल्या बसला होता. 

6 ) मंगेश आगवणे : या आरोपीने आरोपी अरुण डाके याच्या सांगण्यावरून गुन्ह्यात सहभाग घेतला. गुन्ह्यासाठी मोटार सायकल पुरविली. यांच्यासाठी १० हजार स्वीकारले. घटनेच्या दिवशी स्वतः हजार होता. 

7 ) सचिन सुरेश गायकवाड : घटनेच्या दिवशी पाठलाग करून कॉलीस जीप चालविली होती.

8 ) दीपक दलवीरसिंग सिसोदिया : आरोपी नयनसिंग बिस्ट यास जिवंत काडतुसे उपलब्ध करून दिली. 

9 ) छोटा राजन : संघटित टोळीचा म्होरक्या, छोटा राजनच्या आदेशावरून जेडे यांची हत्या, हत्येनंतर आरोपीना पैसे दिले.