तोरणमाळच्या विकासासाठी भरीव काम करणार - ऱावल

राज्यातील क्रमांक दोनचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळची गाथा आणि व्यथा झी २४ तास ने गाव तिथे २४ तास या कार्यक्रमात मांडली. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Dec 8, 2017, 04:07 PM IST
तोरणमाळच्या विकासासाठी भरीव काम करणार - ऱावल title=

नंदुरबार : राज्यातील क्रमांक दोनचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळची गाथा आणि व्यथा झी २४ तास ने गाव तिथे २४ तास या कार्यक्रमात मांडली. 

झी २४ तासाच्या या कार्यक्रमाची दखल राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी घेतली असून, येत्या काही महिन्यात तोरणमाळच्या विकासासाठी भरीव काम केले जाणार असल्याचे मंत्री रावल यांनी आश्वासन दिले. 

सातपुड्यात वसलेल्या वारश्याला जगासमोर उलगडल्याबद्दल  झी २४ तासाचे त्यांनी अभिनंदनही केले. तोरणमाळला जाणारे रस्ते , तेथील राहण्याच्या सुविधा आणि यशवंत तलावाचा गाळ काढण्यासाठी आरखडा तयार करून काम सुरु केले जाईल असे रावल यांनी स्पष्ट केले.