गेलेल आमदार परत येणार का? जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी सोडायला तयार, संजय राऊत म्हणतात मी बाजूला होतो

मी बाजूला होतो, ठाकरेंकडे तुम्ही परत येणार का? राऊतांची शिंदेंसह 40 आमदारांना साद. तर, आम्ही राष्ट्रवादी सोडतो तुम्ही परत या.. साहेबांना त्रास देऊ नका..आव्हाडांचं अजित पवारांना भावनिक आवाहन.

वनिता कांबळे | Updated: Jul 8, 2023, 07:46 PM IST
गेलेल आमदार परत येणार का?  जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी सोडायला तयार, संजय राऊत म्हणतात मी बाजूला होतो  title=

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात मोठे राजकीय भूकंप होत आहेत. उद्धव ठाकरे यांची शिसेना फुटल्यानंतर अवघ्या वर्षभरातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात मोठी फूट फडली आहे. 40 आमदारांसह एकनाथ एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. यानंतर आता अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या आमदारांचा मोठा गट सत्तेत सहभागी झाला आहे. यामुळे महाविकास आघाडीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना परत आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत  मी बाजूला होतो असे म्हणत आमदारांना परत येण्याचे आवाहन करत आहेत. तर, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाय यांनी अजित पवारांना भावनिक साद घातली आहे. 

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांना भावनिक साद घातली. अजित पवारांनी परत यावं, पाहिजे तर मी सगळं सोडून जातो असं आवाहन जितेंद्र आव्हाडांनी केलंय.. तुम्ही परत या मात्र शरद पवारांना त्रास देऊ नका अशी भावनिक साद आव्हाडांनी घातली आहे. मात्र, बैल गेला आणि झोपा केला अशा खोचक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांनी आव्हाडांवर पलटवार केला आहे.

मी बाजूला होता, ठाकरेंकडे तुम्ही परत येताय का? संजय राऊत यांचा सवाल

संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंसह 40 आमदारांना साद घातली आहे. मी बाजूला होता, ठाकरेंकडे तुम्ही परत येताय का असा सवाल संजय राऊतांनी शिंदेंसह 40 आमदारांना विचारला आहे. तर, मुख्यमंत्री  एकनाथ शिंदेंवरही राऊतांनी टीकास्त्र सोडले. उद्धव ठाकरेंनी शिंदेंना सर्व पदं दिली, आमदारकी दिली. मात्र, शिंदेंनी गद्दारी केल्याचा आरोप राऊतांनी केला. तर, राऊतांचं आवाहन शिंदे गटाने मात्र धुडकावून लावले आहे.

राष्ट्रवादीतून बाहेर पडलेले आता चिमण्या राहिल्या नाहीत

राष्ट्रवादीतून बाहेर पडलेले पुन्हा पक्षात परतणार ही शक्यता शरद पवारांनी नाकारली आहे. राष्ट्रवादीतून बाहेर पडलेले आता चिमण्या राहिल्या नाहीत. अशी मिश्किल प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली. जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांसह इतर नेत्यांना पक्षात परतण्याची भावनिक साद घातली होती. त्यावर शरद पवारांना प्रश्न विचारला असता त्यांनी गंमतीशीर उत्तर दिलं.