कोकण रेल्वे कामगारांना भारतीय रेल्वेप्रमाणे बोनस देण्याचे आश्वासन

कोकण रेल्वे कामगारांना भारतीय रेल्वे प्रमाणे बोनस द्यावा, अशी मागणी कोकण रेल्वे कामगार सेनेने प्रशासनाकडे केली.

सुरेंद्र गांगण | Updated: Sep 25, 2018, 10:14 PM IST
कोकण रेल्वे कामगारांना भारतीय रेल्वेप्रमाणे बोनस देण्याचे आश्वासन title=
कोकण रेल्वे कामगार शिवसेना शिष्टमंडळ कोकण रेल्वेचे संचालक संजय गुप्ता , डीएफ अमिताभ बॅनर्जी यांच्याशी चर्चा करताना

मुंबई : कोकण रेल्वे कामगारांना भारतीय रेल्वे प्रमाणे बोनस द्यावा, अशी मागणी कोकण रेल्वे कामगार सेनेने प्रशासनाकडे केली. कामगार सेनेच्या शिष्टमंडळाला बोनस दिला जाईल, असे आश्वासन देण्यात आले. दरम्यान, भारतीय रेल्वे प्रमाणे बोनस देण्यास टाळाटाळ झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाला देण्यात आलाय.

कोकण रेल्वे कामगारांना भारतीय रेल्वेप्रमाणे बोनस द्यावा, या मागणीसाठी एका शिष्टमंडळाने रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष आनंदरावर आडसूळ, सरचिटणीस दिवाकर देव यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण रेल्वेचे संचालक संजय गुप्ता आणि डीएफ अमिताभ बॅनर्जी यांची भेट घेतली आणि चर्चा केली. यावेळी भारतीय रेल्वेप्रमाणे रेल्वे कामगारांनाही बोनस मिळाला पाहिजे आणि तो कसा देण्यात यावा, यावर चर्चा झाली. त्यावेळी दिवाळीचा बोनस देण्याचे आश्वासन संजय गुप्ता यांनी यावेळी दिले.

कोकण रेल्वे यावेळी फायद्यात आहे. त्यामुळे कोकण रेल्वे कामगारांना बोनस देण्यात काहीही अडचण नसल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेप्रमाणे बोनस न मिळाल्यास किंवा देण्यास टाळाटाळ केली तर शिवसेना आपल्या  पद्धतीने आंदोलन करेल, असा इशारा संघटनेचे कार्याध्यक्ष संजय जोशी, संपर्कप्रमुख आशुतोष शुक्ला यांनी दिलाय. शिष्टमंडळ भेटीच्यावेळी कोकण रेल्वेचे सरचिटणीस राजू सुरती, मिनाज झारी उपस्थित होते.