viral video: भर रस्त्यातच सर्कस! लोकांचा जीव धोक्यात घालून तीन चाकांवर एसटी नेली सुस्साट आणि पुढे जे घडलं ते...

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले आगारातून कसारा येथे प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसच्या मागील भागात चार पैकी एक चाक नसूनही बस चालवली.

Updated: Nov 8, 2022, 12:33 PM IST
viral video: भर रस्त्यातच सर्कस! लोकांचा जीव धोक्यात घालून तीन चाकांवर एसटी नेली सुस्साट आणि पुढे जे घडलं ते... title=

योगेश खरे, झी मीडिया, इगतपुरी: गावाकडे जाणारी आपली लालपरी आपल्याला कायमच आकर्षित करते. ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यात लोकल ट्रेनचं (Local Train News Today) महत्त्व आहे त्याप्रमाणेच आपल्या आयुष्यात लाल पिरी म्हणजेच लाल बसही मोठं महत्त्व आहे. लहाणपणी आपण या लाल परीनं खुपदा गावाला गेलो असू. कोकणात जाण्यासाठी किंवा महाराष्ट्रात कुठेही जाण्यासाठी आपण लाल पिरीचा उपयोग करतोच करतो. सध्या या लालपरीचा एक तूफान व्हिडीओ (viral video) समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल. (Lalpari ran on the back 3 wheels endangering the lives of 30 passengers incident revealed near Igatpuri)

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले आगारातून कसारा येथे प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसच्या मागील भागात चार पैकी एक चाक नसूनही बस चालवली. विशेष म्हणजे 30 पेक्षा जास्त प्रवाशांना घेऊन लोकांचा जीव धोक्यात घालण्याची 'लीला' ह्या बसने केली आहे. इगतपुरी जवळ (Igatpuri Expressway) महामार्गावरून ही बस धावत असतांना अन्य एका वाहनधारकाने बसचालकाला सांगितल्याने ही घटना उघडकीस आली. यानंतर ही बस महिंद्रा कंपनीजवळ थांबवण्यात आली आहे. 

नेमका काय घडला प्रकार? 

एसटी बसचा क्रमांक MH 15 BT 4129 असून अनेक प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी उपस्थित प्रवाशाने केली आहे. अकोलेहुन कसारा पर्यंत अनेक वळणदार रस्ते, घाट असल्याने अशा बेजबाबदार कारभारामुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडू शकली असती. सुदैवाने ही घटना उघडकीस आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. एसटीबद्धल अनेक घटनांच्या पार्श्वभूमीवर आजची घटना महत्वाची आहे.