छत्रपतींचे कधीच नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला- राज ठाकरे

Raj Thackeray On Sharad Pawar:  छत्रपतींचे नाव न घेतल्यास मुसलमानांची मतं मिळत नाहीत, अशी यांची समज आहे, असे म्हणत त्यांनी पवारांवर टिका केली. 

Pravin Dabholkar | Updated: Feb 24, 2024, 03:26 PM IST
छत्रपतींचे कधीच नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला- राज ठाकरे title=
Raj Thackeray on Sharad Pawar

Raj Thackeray On Sharad Pawar: छत्रपतींचे कधीच नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शरद पवारांवर केली. तुम्ही शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेता पण छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कधी घेत नाही, असा प्रश्न मी त्यांना विचारला होता. छत्रपतींचे नाव घेतल्यास मुसलमानांची मतं मिळत नाहीत, असे म्हणत त्यांनी पवारांवर टिका केली. शरद पवार यांना तुतारी निशाणी मिळाली आहे तर फुका.. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चिखल झालाय अशी खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली. राजकारणाचा चिखल करणाऱ्यांना लोकांनी यांना वठणीवर आणलं पाहिजे. लोकांनी वठणीवर आणलं नाहीतर राजकारणाचा आणखी चिखल होईल..नुसतं नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावं हे वाटणं हे ठीक आहे. पण खालच्या पातळीवर विचित्र राजकारण सुरु आहे. ज्या तरुणांना राजकारणात यायचंय त्यांना हा आदर्श देणार आहोत का? महाराष्ट्रातील जनतेने सर्वांना वठणीवर आणलं तर ठीक आहे नाहीतर महाराष्ट्राच काही खर नाही, असे ते म्हणाले. अशा प्रकार चा वातावरणं मी केव्हा पाहिलं नाही आणि लोकांनी ही पाहिलं नाही, असे ते म्हणाले. 

चिन्हाचं वेगळं समीकरण पाहायला मिळतंय, यावर त्यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. दरम्यान ही चांगली चिन्ह नव्हेत, असे त्यांनी म्हटले.  महाराष्ट्र मध्ये दुष्काळ ची परिस्थिती आहे बेरोजगार आहे. राज्या राज्यामध्ये राष्ट्रीय पक्षांची गरज नसते. इथले प्रश्न सोडवायला राज्यातील पक्ष असतात. असेही ते यावेळी म्हणाले. 

मराठा आरक्षणासंदर्भातदेखील मी आधीच बोललो होतो. मी विचार करुनच बोलत असतो. त्याचे परिणाम आधीच सांगत असतो. त्यावेळी लोकांना पटत नाही पण कालांतराने कळतात.महाराष्ट्र श्रीमंत राज्य आहे. त्याला विस्कळीत करणं हे अनेकांच ध्येय असेल आणि त्याला बाकीचे त्याला बळी पडत असतील तर हे दुर्देव असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.