महायुतीच्या मंचावरुन राज ठाकरेंचे पुन्हा 'लाव रे तो व्हिडीओ', बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या....'

Raj Thackeray Lav re to Video: राज ठाकरे यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ' च्या अनेक गाजलेल्या सभा सर्व राज्याने पाहिल्या.

Pravin Dabholkar | Updated: May 12, 2024, 09:36 PM IST
महायुतीच्या मंचावरुन राज ठाकरेंचे पुन्हा 'लाव रे तो व्हिडीओ', बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या....' title=
Raj Thackeray Lav re to Video

Raj Thackeray Lav re to Video: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून महायुतीला बिनशर्थ पाठींबा देत असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जाहीर केले. यानंतर त्यांनी महायुतीसाठी सभा घेतल्या. आज श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्यासाठी त्यांनी कळव्यात सभा घेतली. या दरम्यान त्यांचा लाव ते तो व्हिडीओ हा शब्द पुन्हा ऐकायला मिळाला. व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. 

राज ठाकरे यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ' च्या अनेक गाजलेल्या सभा सर्व राज्याने पाहिल्या. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर टीका केली होती. आता राज ठाकरे महायुतीच्या मंचावरुन बोलताना त्यांनी पुन्हा लाव रे तो व्हिडीओ असे म्हटले. आणि सर्वजण खुर्च्या सरळ करुन बसले. आता कोणाचा व्हिडीओ येणार? राज ठाकरे काय बोलणार? या बद्दलची सर्वांची उत्सुकता वाढू लागली. 

'फोडाफोडीचे राजकारण मान्य नाही; बाहेरुन पाठींबा आहे. मी काहीही बोलू शकतो'

अखेर व्हिडीओ लागला 

पुन्हा लाव रे तो व्हिडीओ असे राज ठाकरे म्हणाले. सुषमा अंधारे यांच्या जुन्या भाषणातील क्लिप दाखवण्यात आली. त्यामध्ये त्या बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. यावेळी त्या बाळासाहेबांच्या वयासंदर्भात बोलताना दिसत आहेत. बाळासाहेबांच्या वयावरुन बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही पक्षात घेता आणि नेतेपद देता? असा प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला.

वडील चोरले या विषयावर निवडणूक सुरु आहे. फोडाफोडीचे राजकारण मला मान्य नाही. एकमेकांकडे बघा. या मनसेचे नगरसेवक तुम्ही खोके खोके देऊन तुम्ही फोडले. मागितले असते तर दिले असते. फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनी केली. माझा बाहेरुन पाठींबा आहे. मी काहीही बोलू शकतो. आपल्याला अजून फेविकॉल थोडी लागलाय असे म्हणत त्यांनी श्रीकांत शिंदे यांनाही टोला लगावला. 

'लोकांची मते वाया घालवली'

शिवसेना सोडली तेव्हा बाळासाहेबांना भेटलो. कितीही संकटे आली तरी दुसऱ्या कोणाच्या हाताखाली काम करणार नाही, असे ते म्हणाले. आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं नरेंद्र मोदी, अमित शाह भर सभेत म्हणाले. त्यावेळी तुम्ही का आक्षेप घेतला नाही. लाखो लोकांची मते वाया घालवलीत. आणि ज्यांच्या विरोधात मते मागितली त्यांच्यासोबत गेलात. हल्ली कोण कोणासोबत आहेत हेत कळत नाही, असे ते म्हणाले. या देशात लाखोने चांगले मुसलमान राहतात. त्यांना दंगे नको असतात. पण त्यात मुठभर वाह्यात औलादीपण आहेत. पुण्यात फतवे काढले गेले. मी कॉंग्रेस, ठाकरे गटाला मत देणार असे फतवे निघाले. कारण गेल्या 10 वर्षात डोकं वर काढायला मिळाले नाही. यासाठी त्यांचे पाठींबे सुरु आहे. या देशाच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याचे ते म्हणाले.