आधी घोषणाबाजी मग राडा! संभाजीनगरात ठाकरे गट-महायुतीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले

Sambhajinagar Shivsena mahayuti Rada:  दोन्ही गटाकडून जोरदार जोरदार घोषणाबाजी झाली. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याने दोन्ही गट भिडले. 

Pravin Dabholkar | Updated: May 11, 2024, 01:22 PM IST
आधी घोषणाबाजी मग राडा! संभाजीनगरात ठाकरे गट-महायुतीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले title=
Sambhajinagar Rada

Sambhajinagar Shivsena mahayuti Rada: सध्या राज्यात निवडणुकीचे वारे वाहतायत. वर उन्हाचा पारा चढलाय तर खाली कार्यकर्त्यांच्या प्रचाराचा जोर वाढलाय. प्रत्येक कार्यकर्ता आपल्या नेत्यासाठी जीव की प्राण देऊन प्रचार करतोय. अशावेळी आपल्या नेत्याबद्दल कोणी काही बोलेल त्याला अजिबात माफी नाही, हे सुत्र कार्यकर्ते अवलंबताना दिसतायत. त्यामुळे याचा शेवट एकमेकांविरोधात घोषणाबाजी, हाणामारी, राड्याने होतोय. संभाजीनगरात याची प्रचिती पहायला मिळाली. आधी शिवसेना आणि महायुतीचे कार्यकर्त्यांमध्ये भांडण झालं. त्यात आता मनसेनं बिनशर्थ पाठींबा दिल्याने मनसेचे कार्यकर्तेदेखील राड्यामध्ये बिनशर्थ सामील झाले. बघता बघता याचे रुपांतर मोठ्या राड्यात झाले. काय घडलंय नेमकं? जाणून घेऊया.

येथे शिवसेना ठाकरे गट आणि महायुतीचे कार्यकर्त्यांमध्ये राडा झालाय...दोन्ही गट प्रचारादरम्यान समोरा समोर आले. यानंतर दोन्ही गटाकडून जोरदार जोरदार घोषणाबाजी झाली. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याने दोन्ही गट भिडले. 

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी भुमरे, मोदींविरोधात ठाकरे गटाने घोषणा दिल्या.भुमरेंविरोधात घोषणा देताना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दारुच्या बॉटल दाखवल्या. यावेळी दोन्ही गटात झटापट झाली. संभाजीनगरात शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे विरुद्ध शिवसेना शिंदे गटाकडून संदीपान भुमरे यांच्यात लोकसभेची लढत होतेय.

मनसेनं भाजपला पाठिंबा दिलाय. त्यानंतर संभाजीनगरच्या क्रांती चौकात दोन्ही उमेदवारांचे समर्थक आमने सामने आले.मनसैनिक पैसे घेऊन प्रचार करत असल्याचा आरोप मविआकडून होतोय.

त्यामुळेच मनसे आणि दोनशे अशी टीका आणि घोषणा ठाकरे गटाकडून करण्यात आली. इतकंच नव्हे तर उठ दुपारी आणि घे सुपारी अशा घोषणाही देण्यात आल्या. त्याला उत्तर म्हणून मनसेकडून 20 रुपये वाटण्यात आले.यावेळी क्रांती चौकात राडा झाला.

शिंदे गटाला आम्ही मतपेटीतून उत्तर देऊ अशी प्रतिक्रिया यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली.