ATM लुटण्याच्या तयारीत होता चोरटा, तरुणीने शटर खाली ओढले आणि पुढे...

 पालघर जिल्ह्यात (Palghar ATM Breaks) एका तरुणीने आपली बहादुरी आणि समयसूचकता दाखवत एटीएम मशिन (Woman Foils Man's Bid To Break ATM) लुटण्यास आलेल्या चोरट्याला चांगलाच धडा शिकवला.  

Updated: Mar 14, 2021, 11:31 AM IST
ATM लुटण्याच्या तयारीत होता चोरटा, तरुणीने शटर खाली ओढले आणि पुढे...   title=
प्रातिनिधिक फोटो । रॉयटर्स

मुंबई : Maharashtra: ATM राज्यातील पालघर जिल्ह्यात (Palghar ATM Breaks) एका तरुणीने आपली बहादुरी आणि समयसूचकता दाखवत एटीएम मशिन (Woman Foils Man's Bid To Break ATM) लुटण्यास आलेल्या चोरट्याला चांगलाच धडा शिकवला. चोरटा एटीएम फोडण्याच्या तयारीत असताना पाहिले आणि त्या ठिकाणी तरुणी शांतपणे तिथे दाखल झाली आणि एटीएमचे शटर खाली ओढून घेतले. तरुणीने चोरट्यांना एटीएम लुटण्यास दिले नाही. पोलीस त्याठिकाणी येईपर्यंत शटर खाली ओढून घेत त्याला कोंडून ठेवले. तिच्या या बहादुरीचे पालघर पोलिसांनी (Palghar Police) कौतुक केले आहे.

चोरट्याला रंगेहाथ केले कैद

ही घटना गुरुवार रात्रीची आहे. एक चोरटा एटीएम लुटण्याचा तयारीत आला होता. शस्त्राच्या सहायाने एटीएम फोडण्याचा प्रयत्न करीत होता. त्यावेळी तेथे उभ्या असलेल्या एका तरुणीच्या हा प्रकार लक्षात आला. तिने चतुराईने गप्प राहत एटीएमच्या जवळ पोहोचली आणि पटक एटीएमचे शटर खाली ओढले. त्यामुळे चोरटा एटीएममध्ये अडकला. त्यानंतर तरुणीने आरडाओरडा करत आजुबाजूच्या लोकांना गोळा केले.

 वालीव पोलिसांनी केली अटक

एटीम चोरीच्या बेतात असलेल्या एका चोरट्याला नागरिकांच्या तत्परतेने अटक करण्यात यश आले आहे. रात्रीच्या सुमारास वसई पूर्वेकडील फादरवाडी परिसरात असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये हा चोर घुसला आणि सोबत आणलेल्या हत्यारांनी एटीएम फोडू लागला. हा प्रकार जेव्हा एटीएम बाहेर असलेल्या तरुणीच्या लक्षात आला. त्यानंतर काही महिलांनी वालीव पोलिसांना याबाबतची माहिती दिली. माहिती मिळताच वालीव पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत एटीएममध्ये असलेल्या चोरट्याला पायावर गोळी मारायची धमकी दिली. तेव्हा या चोरट्याने सोबत असलेली हत्यारे पोलिसांच्या ताब्यात देऊन स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले.

पोलिसांनी एटीएम चोरट्याला ओळखले असून त्याचे नाव सलीम मंसूरी आहे. सलीमला एटीएम फोडताना रंगेहात पकडण्यात आले. पोलिसांनी तिच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पालघर पोलिसांनी सलीमविरोधात भारतीय दंड संहिता (Indian Penal Code)कलम 379 (चोरी), 427 (मालमत्तेला नुकसान पोहचविणे) आणि अन्य कलमाद्वारे गुन्हा नोंदवला आहे.