शिर्डी संस्थानच्या जमीन खरेदीवर निर्बंध

शिर्डी संस्थानच्या जमीन खरेदीवर राज्य सरकारनं निर्बंध आणलेत.

Updated: Jun 27, 2018, 07:33 PM IST

शिर्डी : शिर्डी संस्थानच्या जमीन खरेदीवर राज्य सरकारनं निर्बंध आणलेत. शिर्डी संस्थानसाठी राज्य सरकारनं जमीन खरेदी धोरण जाहीर केलंय. समाधी मंदिरपासून लांबच्या जमिनी खरेदी करु नये, शहरापासून १५ किमी परिघाबाहेर जमीन खरेदी नको, बागायती जमीन खरेदी करत असताना एक एकर पेक्षा कमी जमीन खरेदी करू नये, शिर्डी शहरापासून १५ किलोमीटरच्या परिघाबाहेर जमीन खरेदी करू नये, संस्थानच्या जमीनीला लागून असलेल्या जमीनी खरेदी करण्यासाठी प्राधान्य द्यावे, यासह अनेक महत्वाच्या सूचना जमीन खरेदी धोरणात केलेल्या आहेत.