हुप्पा हुय्या! जत्रेत बंदोबस्तासाठी आला, वर्दी काढून मैदानात शिरला... पोलीस पैलवानाने मारलं मैदान

बीडमध्ये चक्क जत्रेच्या बंदोबस्तासाठी आलेला पोलीस जमादार थेट मैदानात उतरला आणि बाजी मारुन गेला. मातीत शिरलेल्या पैलवानाला पाहिला मोठी गर्दी

Updated: Jan 10, 2023, 06:02 PM IST
हुप्पा हुय्या! जत्रेत बंदोबस्तासाठी आला, वर्दी काढून मैदानात शिरला... पोलीस पैलवानाने मारलं मैदान  title=

विष्णु बुरगे, झी मीडिया, बीड : जत्रा उत्सव (fair festival) म्हटलं की कुस्ती ही ठरलेलीच. सध्या महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात जत्रेचा उत्सव सुरु आहे. या ठिकाणी अनेक कुस्त्यांची मैदानंही (Wrestling Competition) पाहिला मिळता. अशाच एका जत्रेतल्या कुस्तीच्या व्हिडिओची (Wrestling Video) सध्या महाराष्ट्रभर चर्चा आहे. बीडमधल्या (Beed) जातेगावमध्ये जत्रेत बंदोबस्तावर आलेला पोलीस जमादर चक्क वर्दी उतरवून मैदानात शिरला. इतकंच नाही तर लातूरच्या मल्लाला त्याने धोबीपछाडही दिला. या कुस्तीचा व्हिडिओ महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरला आहे. 

पोलीस पैलवानाची कमाल
बीड जिल्ह्यात सध्या अनेक देवस्थानच्या ठिकाणी यात्रा उत्सव आयोजित करण्यात आले आहेत. जत्रेच्या निमित्ताने मोठ मोठ्या प्रमाणात कुस्त्यांच्या दंगली देखील आयोजित केल्या जातात. यामध्ये महाराष्ट्रभरातून मल्ल कुस्ती खेळण्यासाठी येता.त मात्र यावेळेस गेवराई तालुक्यातील जातेगाव (Jategaon Fair) इथली कुस्त्यांची दंगल चांगली चर्चेतच राहिली आहे. या जत्रेच्या बंदोबस्तासाठी जातेगाव बीट जमादार हरिभाऊ बांगर आले होते. मुळचे पैलवान असलेल्या हरिभाऊ बांगर यांना कुस्ती खेळण्याचा मोह आवरला नाही.

हरिभाऊ बांगर उतरले मैदानात
हरिभाऊ बांगर यांच्याकडे या जत्रेचा बंदोबस्त होता. कुस्तीच्या मैदानावर बंदोबस्त करत असताना हरिभाऊ बांगर यांनाही कुस्ती खेळण्याचा मोह झाला. दुसऱ्या जिल्ह्यातील मल्ल आपल्या जिल्ह्यातील मल्लांवर भारी पडत असल्याचं पाहून बांगर यांनी अंगावरची खाकी उतरवली आणि थेट मैदानात उडी घेतली. खाकीतील पोलीस मैदानात उतरलेला पाहातच कुस्ती पाहण्यासाठी तुफान गर्दी झाली. हरिभाऊ बांगर यांचा सामना लादूरच्या मल्लाबरोबर झाला. पण हरिभाऊ बांगर यांनी डावपेच टाकत लातूरच्या मल्लाला धोबीपछाड दिला.

हे ही वाचा : UP Crime : 'तुम सिर्फ मेरी हो....'; आठवीतल्या मुलानं गळ्यावर चाकू ठेवत सहावीच्या मुलीच्या भांगेत भरला सिंदूर

हरिभाऊ बांगर यांनी कुस्तीचं मैदान मारत जातेगावच्या कुस्तीवर आपलं नाव कोरलं. सध्या या कुस्तीची महाराष्ट्रभर चर्चा आहे. खाकी वर्दीतला माणून जेव्हा मैदानात उतरतो त्यावेळीस छोबीपछाड दिल्याशिवाय रहात नाही, अशीच चर्चा जिल्ह्यात सुरु आहे. पोलीस जमादार हरिभाऊ बांगर यांचं सध्या चांगलच कौतुक होत आहे.