Maharashtra Politics : शिंदे गटाला केंद्रीय मंत्रिमंडळात मिळणार 4 मंत्रिपदे?, विस्तार येत्या 10 दिवसांत !

Maharashtra Politics: केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या 10 दिवसांत होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला काही मंत्रीपदे येण्याची शक्यता असून शिंदे गटाला मिळणार 4 मंत्रिपदे देण्यात येणार आहेत.

Updated: Feb 18, 2023, 08:48 AM IST
Maharashtra Politics : शिंदे गटाला केंद्रीय मंत्रिमंडळात मिळणार 4 मंत्रिपदे?, विस्तार येत्या 10 दिवसांत ! title=

Maharashtra Political News : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता भारतीय निवडणूक आयोगाने दिली आहे. (Shinde Vs Thackeray) त्यामुळे ठाकरेशिवाय आता शिवसेना असणार आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा मोठा निर्णय झाला. ( Political News ) या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे. (Maharashtra Politics) पक्ष आणि चिन्ह गेल्याने ठाकरे गट अडचणीत सापडला आहे. मात्र, शिंदे गोटात मोठा जल्लोष पाहायला मिळत आहे. मेरीटवर आमचा विजय झाल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. आता शिंदे गटासाठी एक चांगली बातमी आहे. मोदी सरकारमध्ये (Modi Govt) शिंदे गटाला ( Shinde Group ) स्थान मिळण्याची शक्यता आहे. जवळपास चार जणांना केंद्रीय मंत्रिमंडळात (Union Cabinet Expansion) स्थान मिळण्याची शक्यता आहे. ( Maharashtra Political News in Marathi )

दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याची उत्सुकता सर्वांनाच असताना आता थेट केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. शिंदे गटातील  काही इच्छुक खासदारांना मंत्रीपदाची ऑफर मिळणार आहे. त्यामुळे कोणाला संधी मिळणार याची मोठी उत्सुकता आहे.

महाराष्ट्रातील आमदारही मंत्रिमंडळ विस्ताराची आतुरतेने वाट वाट पाहत असताना राज्य मंत्रिमंडळ विस्ताराआधीच केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला चार मंत्रीपदं मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. शिंदे गटाला दोन कॅबिनेट मंत्रिपद आणि दोन राज्यमंत्रिपदे मिळणार असल्याची माहिती आहे. मुंबई, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना संधी मिळू शकते. राहुल शेवाळे, प्रतापराव जाधव आणि श्रीरंग बारणे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार करताना मोदी सरकारने मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवल्याचे बोलले जात आहे. शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्याने मुंबईत निवडणूक सोपी जावी आणि शिंदे गटाची मदत मिळाली म्हणून स्थायी समिती अध्यक्ष राहिलेले राहुल शेवाळे यांना मंत्रीपद दिले जाणार असल्याची चर्चा आहे. तर श्रीरंग बारणेंना मंत्रीपद देऊन पश्चिम महाराष्ट्र मजबूत करण्यावर शिंदे गटाचा भर असणार आहे. विदर्भातही प्रतापराव जाधव यांना मंत्रीपद दिले जाईल अशी मोठी शक्यता आहे.