महावितरणमध्ये विविध पदांची भरती, चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी 'येथे' पाठवा अर्ज

Mahavitaran Bharti: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. 

Pravin Dabholkar | Updated: May 18, 2024, 01:41 PM IST
महावितरणमध्ये विविध पदांची भरती, चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी 'येथे' पाठवा अर्ज  title=
Mahavitaran Bharti
Mahavitaran Bharti: तुम्ही पदवीधर आहात? तुमचं बीई किंवा बीबीए झालंय आणि तुम्ही नोकरी शोधताय? तर मग तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. कारण महावितरण म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी इच्छुकांकडून ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.
 
महावितरणमध्ये कनिष्ठ सहाय्यक, पदवीधर अभियंता, पदविका अभियंता ही पदे भरली जाणार आहेत. या पदांच्या एकूण 800 जागा रिक्त आहेत. यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तुम्हालादेखील यासाठी अर्ज करायचा असेल तर रिक्त पदे, शैक्षणिक अर्हता, पगार याचा तपशील आधीच माहिती करुन घ्या. याचा सविस्तर तपशील जाणून घेऊया.

ज्युनिअर असिस्टंट

महावितरण भरती अंतर्गत ज्युनिअर असिस्टंटची 468 पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तींनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून बीकॉम/बीएमएस/ बीबीए असणे आवश्यक आहे.यासोबतच उमेदवारांना एमएससीआयटी किंवा समकक्ष ज्ञान असणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवाराला पहिल्या वर्षी 19 हजार, दुसऱ्या वर्षी 20 हजार तर तिसऱ्या वर्षी 21 हजार रुपये पगार दिला जाणार आहे.

ग्रॅज्युएट इंजिनीअर

ग्रॅज्युएट इंजिनीअरची 281 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून इलेक्ट्रीकल किंवा सिविल इंजिनीअरिंगची पदवी घेणे आवश्यक आहे. या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 22 हजार रुपये इतका पगार मिळेल. 

ग्रॅज्युएट असिस्टंट

ग्रॅज्युएट असिस्टंटची 51 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून इलेक्ट्रीकल किंवा सिविल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा केलेला असणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 18 हजार इतका पगार दिला जाणार आहे. 

अर्जाची शेवटची तारीख

अधिकृत वेबसाइट www.mahadiscom.in वर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येणार आहे. 20 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जात काही त्रुटी असल्यास अर्ज फेटाळला जाईल,याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा