Mahavitaran Strike : कोयना आणि चंद्रपूर वीज केंद्रातील वीज निर्मिती बंद, वीज कर्मचारी संपाचा मोठा फटका

Mahavitaran Strike News : वीज कर्मचारी संपाचा मोठा फटका आता बसू लागला आहे. ग्रामीण भागातील बत्ती गुल झाली आहे. तसेच या संपाचा कोयना वीजनिर्मिती प्रकल्पाला फटका बसला आहे. 

Updated: Jan 4, 2023, 10:21 AM IST
Mahavitaran Strike : कोयना आणि चंद्रपूर वीज केंद्रातील वीज निर्मिती बंद, वीज कर्मचारी संपाचा मोठा फटका  title=

Mahavitaran Strike News Updates : वीज कर्मचारी संपाचा मोठा फटका आता बसू लागला आहे. ग्रामीण भागातील बत्ती गुल झाली आहे. (MSEB Strike) तसेच या संपाचा कोयना वीजनिर्मिती प्रकल्पाला (Koyna Power Project ) फटका बसला आहे. कोयना विद्युत केंद्रातील एक युनिट बंद पडले आहे. तर चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील (Chandrapur Thermal Project) वीज निर्मितीला फटका बसला आहे. 210 मेगावॅट क्षमतेचं युनिट 4 आणि 500 मेगावॅट क्षमतेचं युनिट 5 पडले बंद, युनिट 4 मध्ये एअर हीटरची समस्या उद्धभवली आहे.

Mahavitaran Strike LIVE : महावितरण संपाचा मोठा परिणाम, ग्रामीण भागातील बत्ती गुल

कोयना प्रकल्पातील वीजनिर्मितीवर मोठा परिणाम 

कर्मचाऱ्यांअभावी कोयना प्रकल्पातील 36 मेगावॅटचे एक युनिट बंद आहे. कोयना धरणाच्या पायथा वीज प्रकल्पातील 35 कर्मचारी संपामध्ये सहभागी आहेत. पोफळी वीजनिर्मिती प्रकल्पातीलही कर्मचारी संपामुळे कामावर आलेले नाहीत. कर्मचारी संपामुळे कोयना प्रकल्पातील वीजनिर्मितीवर मोठा परिणाम होवू शकतो.

चंद्रपूर वीज केंद्रातील अनेक युनिट बंद 

राज्यातील वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील वीज निर्मितीला फटका बसला असून 210 मेगावॅट क्षमतेचं युनिट 4 आणि 500 मेगावॅट क्षमतेचं युनिट 5 बंद  पडले आहे. युनिट 4 मध्ये एअर हीटरची समस्या उद्धभवली आहे तर युनिट 5 मध्ये कोळशाची राख बाहेर निघण्याच्या प्रक्रियेत बिघाड आल्याने दोन्ही युनिट करण्यात आले आहेत. 

 चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील 2500 कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. सध्या कंत्राटी कामगार, NTPC आणि BHEL च्या कर्मचाऱ्यांच्यामदतीने युनिट सुरु करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र स्थानिक वीज केंद्रातील कुशल कर्मचारी संपात सहभागी असल्याने अडचण निर्माण झाली आहे. 500 मेगावॅट क्षमतेचं युनिट 7 या आधीच टर्बाइनच्या दुरुस्तीसाठी आहे बंद त्यामुळे सध्या 2920 मेगावॅट क्षमतेच्या चंद्रपूर महाऔष्णीक वीज केंद्रातून होतेय 1520 मेगावॅट वीज निर्मिती होत असते.

खापरखेडा पॅावर प्लांट येथील तीन संच संपामुळे बंद 

वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पॅावर प्लांट येथील तीन संच संपामुळे बंद आहेत. खापरखेडा पॅावर प्लांट येथील युनीट 2, 3 आणि 4 बंद असल्याने विद्युत पुरवठ्यावर याचा परिणाम झालाय.  खापरखेडा पॅावर प्लांट येथील 95 टक्के कर्मचारी संपावर आहेत. संपामुळे खापरखेडा पॅावर प्लांट येथील वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

सरकारच्या इशाराकडे वीज कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष

 दरम्यान, अदानीविरोधात राज्यभरातील वीज कर्मचारी संपावर गेले आहेत. महावितरण कंपनीच्या खासगीकरणाच्या विरोधात हा संप पुकारण्यात आला आहे. कर्मचारी संपावर गेल्यानं अनेक भागात बत्ती गुल झाली आहे. सरकारच्या इशाऱ्यानंतरही कर्मचारी संपावर ठाम आहेत. महावितरण कंपनीच्या खासगीकरणाच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी तीन दिवसांचा संप पुकारला आहे. तर वीज कर्मचारी संपावर गेल्यास मेस्मा म्हणजे अत्यावश्यक सेवा कायदा लागू करण्याचा इशारा राज्य सरकारनं दिला आहे. सरकारच्या इशा-यानंतरही संपावर जाणारच, असा ठाम निर्धार संपकरी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलाय.