मराठा मोर्चा - यवतमाळमध्ये मोटार सायकल रॅली

क्रांती मोर्चाच्या तयारीनिमित्त यवतमाळमध्ये भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली. 

Updated: Aug 7, 2017, 08:38 PM IST
मराठा मोर्चा - यवतमाळमध्ये मोटार सायकल रॅली title=

यवतमाळ : ९ ऑगस्ट क्रांतिदिनीं मुंबईत आयोजित मराठा कुणबी क्रांती मोर्चाच्या तयारीनिमित्त यवतमाळमध्ये भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली. 

शेकडो समाजबांधव मोटरसायकल रॅलीत सहभागी झाले होते. सरकार मराठा कुणबी समाजाच्या मागण्यांची दखल घेत नाहीत यासाठी हा मोर्चा आहे.

 मुंबईत आयोजित महामोर्चामध्ये सकल मराठा-कुणबी बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. रॅलीत महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.