मराठा आरक्षणासाठी शरद पवार आक्रमक

शरद पवार यांनी राज्य सरकारला सल्ला दिलायं.

Updated: Jul 29, 2018, 11:29 AM IST

कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी घटना दुरूस्ती करणे शक्य आहे. घटना दुरूस्ती करण्याचा निर्णय जर केंद्र सरकारने घेतला तर विरोधकांना त्याची गरज मी समजावून सांगेन अशी भूमिका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी घेतली आहे. घटना दुरूस्ती केली तर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते असेही त्यांनी म्हटले आहे. कोल्हापुरातील दसरा चौकात सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला शरद पवारांनी हजेरी लावली आहे. त्याआधी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारला हा सल्ला दिला.

अजित पवारांचा आरोप 

मराठा समाजाची जी आंदोलन सुरु आहेत त्याला कुणाचं नेतृत्व नाही. तो एक प्रकारचा उद्रेक आहे, अशा परिस्थितीत सत्ताधाऱ्यांकडून चुकीची आणि  चिथावणी देणारी वक्तव्य केली जातात, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला आहे. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस आणि चिंतामणी ज्ञानपीठ यांच्यावतीनं पुण्यात गुरुजन गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.