धक्कादायक! मराठा आरक्षण मागणीसाठी सुनील लागणेंचा अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

Maratha reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ध्वजारोहणाच्या वेळी मराठा वनवासी यात्रेच्या संयोजक सुनील लागणे व प्रताप कांचन पाटील यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

Updated: Sep 17, 2023, 10:01 AM IST
धक्कादायक! मराठा आरक्षण मागणीसाठी सुनील लागणेंचा अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न title=

Maratha reservation: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर मनोज जरांगे-पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले. पण मराठा आरक्षण मुद्दा अजूनही धगधगता आहे. मराठा वनवास यात्रेचे सुनील लागणेंकडून आत्मदहनाचा प्रयत्न केला. ध्वजारोहण सुरू असतानाच त्यांच्याकडून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर सुनील नागणे आणि प्रताप कांचन पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ध्वजारोहणाच्या वेळी मराठा वनवासी यात्रेच्या संयोजक सुनील लागणे व प्रताप कांचन पाटील यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली तर सरकारच्या निषेधाच्या ही घोषणा दिल्या. मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं असलं तरी मराठा वनवास यात्रेचे संयोजक सुनील नागणे हे आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. 

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण द्यावे यासाठी आज 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा होत आसताना धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठ्यांना आरक्षण मिळावे या मागणीसाठी नागणे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. माञ वेळीच पोलीसांनी नागणे यांना ताब्यात घेतले. या आंदोलनाने जिल्हाधिकारी कार्यालया परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं.