आदिवासी आश्रम शाळेतील दहावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या

घाटंजी तालुक्यातील रामपूर इथल्या आदिवासी आश्रम शाळेत शिकणाऱ्या दहाव्या वर्गातील विद्यार्थिनीने गळफास लावुन आत्महत्या केली आहे. 

Updated: Jan 10, 2018, 10:04 AM IST
आदिवासी आश्रम शाळेतील दहावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या title=

यवतमाळ : घाटंजी तालुक्यातील रामपूर इथल्या आदिवासी आश्रम शाळेत शिकणाऱ्या दहाव्या वर्गातील विद्यार्थिनीने गळफास लावुन आत्महत्या केली आहे. 

काय आहे कारण?

राजश्री चोरंग कोटनाके असे मृत मुलीचे नाव आहे. या निवासी आश्रमशाळेत प्रार्थनेवेळी ती एका खोलीत गेली. तिथेच गळफास घेऊन तिने आत्महत्या केली. तिने मृत्यूपूर्व चिठ्ठी लिहिली असून त्यात सहकारी विद्यार्थीनी तिला एका मुलाच्या नावाने चिडवीत असल्याचे नमूद आहे. 

घातपात असल्याचा वडीलांचा आरोप

चिठ्ठीत तिने आत्महत्येस जबाबदार असलेल्या कुणाचीही नावं लिहिलेली नाही. मात्र राजश्रीची आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. गेल्याच महिन्यात घाटंजी तालुक्यातील नवोदय विद्यालयातही एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. निवासी शाळेतील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येने घाटंजी तालुका हादरला आहे.