MNS Lok Sabha Candidates : मनसेने लोकसभेचं रणशिंग फुंकलं, राज ठाकरेंच्या 14 शिलेदारांची यादी समोर!

MNS Potential Candidates List : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून गेल्या काही महिन्यापासून लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी केली जातेय. अशातच आता मनसेच्या लोकसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे.

देवेंद्र कोल्हटकर | Updated: Jan 6, 2024, 11:12 PM IST
MNS Lok Sabha Candidates : मनसेने लोकसभेचं रणशिंग फुंकलं, राज ठाकरेंच्या 14 शिलेदारांची यादी समोर! title=
MNS Potential Candidates List

Lok Sabha elections 2024 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) गेल्या काही महिन्यापासून लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी केली जातेय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांबरोबर लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने बैठका घेऊन आढावा घेतला आहे. राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. मात्र, गेल्या काही दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सातत्याने भेटीगाठी झालेल्या आहेत, त्यासोबत भाजपच्याही अनेक नेत्यांनी राज ठाकरे यांच्या भेटी घेतलेल्या आहेत. त्यामुळे आता मनसेमध्ये धाकधूक वाढत असल्याचं चित्र समोर आलं आहे. अशातच आता मनसेच्या लोकसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे. 

मनसेचे लोकसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवार

चंद्रपूर - राजू उंबरकर
नाशिक - डॉ. प्रदीप पवार
कल्याण- राजू पाटील
ठाणे- अभिजित पानसे
उत्तर मुंबई- गजानन राणे
ईशान्य मुंबई- संदीप देशपांडे
उत्तर मध्य- मुंबई संजय तुर्डे
दक्षिण मध्य मुंबई- नितीन सरदेसाई
दक्षिण मुंबई- बाळा नांदगावकर
रायगड- वैभव खेडेकर
पुणे- वसंत मोरे/साईनाथ बाबर
बारामती- सुधीर पाटस्कर
सोलापूर- दिलीप धोत्रे

मनसे स्वबळावर निवडणूक लढणार की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत किंवा भाजप सोबत युती करणार? हे पाहणं महत्त्वाचा असेल. त्यामुळे सध्या मनसेची संभाव्य यादी चर्चेत आहे जवळपास ही नावानिश्चित मानली जात आहेत. मात्र, अंतिम निर्णय राज ठाकरे घेणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

दरम्यान, मनसेनं 2009 च्या निवडणुकीत 13 आणि 2014 च्या निवडणुकीत 11 उमेदवार उभे केले होते. तर 2019 ची निवडणूक मनसेनं लढवली नव्हती. मात्र लाव रे तो व्हिडिओ म्हणत मोदींविरोधात सभा घेतल्या होत्या. यंदा लोकसभेला मनसेचं इंजिन कुणाला धडकणार आणि कुणाचं गणित बिघडवणार, याची चर्चा सुरू झालीय.