अकोला, अमरावतीत मान्सूनपूर्व पावसाला सुरूवात

जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात अचानक मान्सूनपूर्व पावसाला सुरूवात झाली. दुपारी साडेचारच्या सुमारात पावसाळा सुरूवात झाली. वादळी वा-यासह पावसाळा सुरूवात झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 27, 2017, 07:18 PM IST
अकोला, अमरावतीत मान्सूनपूर्व पावसाला सुरूवात title=

अकोला : जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात अचानक मान्सूनपूर्व पावसाला सुरूवात झाली. दुपारी साडेचारच्या सुमारात पावसाळा सुरूवात झाली. वादळी वा-यासह पावसाळा सुरूवात झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. 

या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झालाय. 

पावसाच्या सरी 

अमरावतीत दुपारी चारच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन उकाड्यापासून दिलासा मिळाला. अचानक आलेल्या पावसामुळे बाजार समितीमधील बहुतांश तूर, चना आणि इतर धान्य काही प्रमाणात भिजले. 

सुमारे अर्धा तास आलेल्या पावसामुळे अमरावती शहरातील अनेक भागात वीज पुरवठा खंडित झालाय.