मुंबईकरांचा पाणी प्रश्न सुटणार? BMC चा मास्टर प्लान तुम्हीही पाहून घ्या

Mumbai News: गेल्या काही वर्षांत मुंबईला पावसाळ्यात उशीर झाल्यामुळे 10 ते 15 टक्क्यांपर्यंत  पाणीकपातीचा सामना करावा लागत आहेत. पण आता हाच पाणी प्रश्न कायमचा सुटणार आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: Mar 4, 2024, 11:43 AM IST
मुंबईकरांचा पाणी प्रश्न सुटणार? BMC चा मास्टर प्लान तुम्हीही पाहून घ्या  title=

Mumbai BMC to make underground Water Tunnel : मुंबईकरांचा पाणी प्रश्न लवकरच सुटणार आहे. कारण  सध्या 4,200 दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) मागणीच्या तुलनेत मुंबईला 3,950 एमएलडी मिळते. या 250 एमएलडीच्या तुटवड्याव्यतिरिक्त, असमान वितरण आणि अधूनमधून होणारा पुरवठा यामुळे शहराच्या पाण्याचा ताण वाढतो. गेल्या काही वर्षांत मुंबईला पावसाळ्यात उशीर झाल्यामुळे 10-15 टक्क्यांपर्यंत पाणीकपातीचा सामना करावा लागला आहे. याचपार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) मुंबईकरांचा पाणी प्रश्न सुडवण्यासाठी मास्टर प्लान केला आहे.  नेमका हा मास्टर प्लान काय आहे?  ते जाणून घ्या.. 

मुंबईला पाणीपुरवठा करणारे जलवाहिनी या ब्रिटिशकालीन आहेत. त्यामुळे या जलवाहिन्या जीर्ण झाल्यामुळे मुंबईकरांना वारंवार पाणी गळतीला सामोरे जावे लागते. याच पाण्याची गळती रोखण्यासाठी मुंबईला शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी येवई जलाशय ते मुलुंड दरम्यान 21 किमी लांबीचा जल बोगदा बांधण्याचा निर्णय मुंबई महापालिका घेतला आहे. हा जलबोगदा भूमिगत असणार आहे. 

हा जलबोगदा दोन टप्प्यात बांधला जाणार आहे. या प्रकल्पासाठी 4,500 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. हा बोगदा 7 वर्षात तयार होईल. तसेच नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातील तलावांमधून मुंबईला दररोज पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. विविध विकासकामांमुळे पाइपलाइन फुटण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. भूमिगत बोगदा बांधल्याने पाइपलाइनमधील गळती आणि चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होईल. 
 
तसेच मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून मुंबईला 3950 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. यापैकी दोन हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठा उपलब्ध धरणातून होतो. भातसा धरणातून मुंबईद्वारे पुरविण्यात येणाऱ्या दोन हजार दशलक्ष लिटर पाण्यापैकी 1365 दशलक्ष लिटर पाणी पांजरापूर जलशुद्धीकरण प्रकल्पात शुद्ध केले जाते. 

त्यानंतर मुंबईत पाण्याचे पाइप उपलब्ध होतो. मात्र मुंबई-नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणामुळे आणि सुरक्षित पाणीपुरवठ्याच्या दृष्टिकोनातून जमिनीवर राबविण्यात येणाऱ्या मुख्य जलवाहिन्यांसाठी पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे. त्यासाठी कशेळी ते मुलुंड दरम्यान जादा क्षमतेचा जलबोगदा बांधण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर महापालिका पाणी बोगद्य पाणी शुद्धीकरणासाठी वापरण्यास सुरुवात करेल. 

असा असेल जलबोगदा

पहिल्या टप्प्यात येवई जलाशय ते कशेळी (भिवंडी) असा 14 किमी लांबीचा बोगदा आणि दुसऱ्या टप्प्यात कशेळी ते मुलुंड असा 7 किमी लांबीचा बोगदा बांधण्याची BMCच्या पाणीपुरवठा योजना विभागाची योजना आहे. त्याच्या बांधकामासाठी निविदाही काढण्यात आल्या आहेत. दोन्ही जलबोगद्याच्या उभारणीसाठी 7 वर्षांचा कालावधी लागणार आहे.