Vande Bharat Express कोकण रेल्वे मार्गावर आठवड्यातील 3 दिवस धावणार तरीही 6 दिवस दिसणार! अधिक जाणून घ्या

Mumbai Goa Vande Bharat Train: वंदे भारत एक्स्प्रेस कोकण रेल्वे मार्गावरुन सुस्साट धावत आहे. सध्या मान्सून वेळापत्रकानुसार ही वंदे भारत आठवड्यातून तीनच दिवस धावणार आहे. परंतु ती आठवड्यातील सहा दिवस दिणार आहे. त्याचे कारण म्हणजे ...

सुरेंद्र गांगण | Updated: Jul 5, 2023, 10:39 AM IST
Vande Bharat Express कोकण रेल्वे मार्गावर आठवड्यातील 3 दिवस धावणार तरीही 6 दिवस दिसणार! अधिक जाणून घ्या title=
Mumbai Goa Vande Bharat Train

Vande Bharat Express : कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस नियमित सुरु झाली आहे. सध्या मान्सून वेळापत्रकानुसार ही वंदे भारत आठवड्यातून तीनच दिवस धावणार आहे. मात्र, वंदे भारत ही गाडी कोकण रेल्वे मार्गावर आठवड्यातील सहा दिवस दिसणार आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्यातील मडगाव दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरु झाली आहे. या रेल्वेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही  एक्स्प्रेस जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रानुसार आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे. परंतु मान्सून वेळापत्रकानुसार आठवड्यातील तीनच दिवस धावणार आहे. असे असले तरी कोकण रेल्वेच्या मार्गावर ही  एक्स्प्रेस आठवड्यातील सहा दिवस दिसणार आहे. इतकेच नव्हे तर पावसाळ्यात देखील ती तिच्या थांब्यांवर देखील आठवड्यातील सहा दिवस पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला याचा विचार पडला असेल की, हे कसं काय शक्य आहे? आठवड्यातून 3 दिवस धावणार आणि 6 दिवस दिसणार ! याचे नेमकं गणित काय आहे?  कोकण रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार परिणाम

मान्सून वेळापत्रकानुसार वंदे भारत आठवड्यातून 3 दिवस 

सध्या मान्सून वेळापत्रकानुसार ही वंदे भारत आठवड्यातून तीनच दिवस धावणार आहे. परंतु ती आठवड्यातील सहा दिवस दिणार आहे. त्याचे कारण म्हणजे वंदे भारत एक्स्प्रेस ही एकच गाडी आहे. त्यामुळे तिच्या निर्धारित वेळेनुसार धावण्यासाठी एक गाडी पुरेशी नाही. त्यामुळे पर्यायी म्हणून ती एक दिवसाआड अप-डाऊन धावणार आहे. तर एक दिवस ती बंद राहणार आहे. म्हणजे मुंबईच्या दिशेने तीन दिवस आणि मडगाव (गोवा) या दिशेने मुंबईकडे असे तीन दिवस वंदे भारत धावणार आहे. त्यामुळे अप आणि डाऊनचा विचार करता ती आठवड्यातून सहा दिवस कोकण रेल्वे मार्गावर ही गाडी दिसणार आहे. वंदे भारतमुळे कोकण रेल्वेमार्गावरील 5 गाडया सायडिंगला पडणार, प्रवासाला उशीर?

मुंबई आणि मडगावमधून 'या' दिवशी सुटणार 'वंदे भारत'

27 जून रोजी मडगाव (गोवा) येथे शुभारंभ झालेल्या कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसच्या नियमित फेऱ्या 28 जून 2023 पासून सुरु झाल्या आहेत. ही हाय स्पीड ट्रेन नॉन मॉन्सून वेळापत्रकानुसार आठवड्यातील शुक्रवार वगळून सहा दिवस धावणार आहे तर सध्या सुरु असलेल्या पावसाळी वेळापत्रकानुसार ( 10 जून 31 ऑक्टोबर 2023) वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून तीनच दिवस धावणार आहे. म्हणजे मुंबई सीएसएमटी ते मडगाव मार्गावर (22229) ही गाडी सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी धावणार आहे. तसेच मडगाव ते मुंबई सीएसएमटी मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस (22230) मंगळवार, गुरुवार तसेच शनिवारी धावणार आहे. म्हणजेच आठवड्यातील अप आणि डाऊन या दोन्ही दिशांचा विचार करता ही गाडी सहा दिवस धावणार आहे. 

सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस पावसाळ्यात मुंबईहून सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सुटेल. ही गाडी सीएसएमटीहून पहाटे 5.23 वाजता सुटेल आणि 10 तासांनंतर दुपारी 3.30 वाजता मडगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी ही गाडी मडगावहून दुपारी 12.20 वाजता सुटेल आणि रात्री 10.25 वाजता सीएसएमटीला पोहोचेल. पावसाळ्यात ही गाडी मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी मडगावहून धावेल.

पावसाळा संपल्यानंतर, या 8 डब्यांच्या ट्रेनला 11 थांबे असतील आणि 568 किमी अंतर कापण्यासाठी 7.50 तास लागतील. सध्या सर्वात वेगवान ट्रेन असलेल्या तेजस एक्स्प्रेसला हेच अंतर कापण्यासाठी 8 तास 50 मिनिटं लागतात. या तुलनेत वंदे भारत ट्रेनचा वेग अधिक जास्त आहे आणि त्यामुळे एका तासची बचत होणार आहे.

Vande Bharat Express मुंबई ते मडगांवपर्यंत प्रत्येक ठिकाणाचा तिकिट दर पाहा

मुंबई CSMT - मडगाव -  एसी चेअर कार -1815 रुपये आणि EC Executive Class साठी 3360 रुपये

मुंबई दादर  - मडगाव -  एसी चेअर कार -1815 रुपये आणि EC Executive Class साठी 3360 रुपये

मुंबई CSMT  - रत्नागिरी -  एसी चेअर कार -1120 रुपये आणि EC Executive Class साठी 2125 रुपये

पनवेल - रत्नागिरी - सीसी एसी चेअर कार -1010 रुपये आणि EC Executive Class साठी 1900 रुपये

रत्नागिरी  - मडगाव -  एसी चेअर कार -1055 रुपये आणि EC Executive Class साठी 1880 रुपये

मुंबई CSMT  - कणकवली -  एसी चेअर कार -1365 रुपये आणि EC Executive Class साठी 2635 रुपये

पनवेल - कणकवली -  सीसी एसी चेअर कार -1270 रुपये आणि EC Executive Class साठी 2450 रुपये

कणकवली - मडगाव -  एसी चेअर कार - 790 रुपये आणि EC Executive Class साठी 1355 रुपये

मुंबई CSMT - मडगाव -  एसी चेअर कार -1815 रुपये आणि EC Executive Class साठी 3360 रुपये

पनवेल - थिविंम -  सीसी एसी चेअर कार -1660 रुपये आणि EC Executive Class 3015 रुपये