बनावट गुणपत्रिका बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

 बनावट गुणपत्रिका बनवून विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळले

Updated: Oct 13, 2018, 06:25 PM IST
बनावट गुणपत्रिका बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश title=

प्रणव पोळेकर, झी मीडिया, मुंबई : जिल्ह्यात इंजिनियरिंग अभ्यासक्रमाच्या बनावट गुणपत्रिका बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालायं. बनावट गुणपत्रिका बनवून विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळणाऱ्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले. रत्नागिरी पोलिसांनी फिनोलेक्स महाविद्यालयातून आलेल्या तक्रारीवरून ही कारवाई केली आहे.. फिनोलेक्सच्या प्राध्यापकांनी तक्रार दाखल केली होती.

४ कर्मचाऱ्यांना अटक 

या घटनेत मुंबई विद्यापीठाच्या ४ कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली असल्याने शिक्षणक्षेत्रात खळबळ उडाली आहे.

३ दिवसांपुर्वी ही कारवाई करण्यात आली होती. या घटनेने विद्यापीठाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

रत्नागिरी पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत एका विद्यार्थ्यासह एकूण ६ जणांना अटक केली आहे.