महिला टॉयलेटच्या खिडकीतून शूट करायचा अश्लील Video; नागपूरमध्ये शिक्षकाला अटक

Crime News Teacher Shooting Obscene Video Of women: नागपूर शहरातील वेगवेगळ्या भागांमधील सार्वजनिक शौचालयांमध्येही त्याने महिलांचे व्हिडीओ बनवल्याची माहिती समोर आली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 31, 2024, 07:34 AM IST
महिला टॉयलेटच्या खिडकीतून शूट करायचा अश्लील Video; नागपूरमध्ये शिक्षकाला अटक title=
यासंदर्भातील तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांची कारवाई (प्रातिनिधिक फोटो)

Crime News Teacher Shooting Obscene Video Of women: नागपूर विद्यापीठ परिसरामध्ये आयोजित खासदार औद्योगिक मोहोत्सव कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांचे अश्लील व्हिडीओ काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी एका शालेय शिक्षकाला अटक केली आहे. अंबाझरी पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे. आरोपीने लपूनछपून वॉशरुमच्या खिडकीतून महिलांचे अश्लील व्हिडीओ बनवत होता. काही महिलांनी यासंदर्भातील माहिती आयोजकांना दिली. तातडीने पोलिसांना यासंदर्भात माहिती देण्यात आल्यानंतर चौकशीअंती आरोपीला अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव मंगेश खापरे असं आहे. 37 वर्षीय मंगेश कसारपुरा येथील तीन नळ चौकात वास्तव्यास आहे.

असा झाला खुलासा

पोलिसांनी कार्यक्रम आयोजित करणाऱ्या टीममधील एका महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केला आहे.  मंगेश हा एका नामवंत खासगी शाळेमध्ये कला विषय शिकवतो. या मोहोत्सवाच्या प्रवेशद्वाराचं डिझाइन करण्यासाठी मंगेशला बोलवण्यात आलं होतं. सोमवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास तक्रारदार महिलेने तिच्यासोबत काम करणाऱ्या महिला स्वयंसेवकला रडताना पाहिलं. यासंदर्भात विचारपूस केली असता रडणाऱ्या महिलेने, ती विद्यापीठातील इक्वल अपॉर्च्युनिटी सेलच्या इमारतीतील वॉशरुममध्ये गेली होती. यावेळेस एका व्यक्ती तिचा व्हिडीओ रेकॉर्ड करत असल्याचं तिला दिसलं. महिलेने या व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र खिडकीच्या काचेमुळे महिला या प्रयत्नात जखमी झाली. व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीने तिथून पळ काढला. अशाच प्रकारच्या तक्रारी इतर महिलांनाही केल्या. तातडीने आयोजकांनी पोलिसांना याबद्दलची माहिती दिली. अंबाझरी पोलीस स्टेशनमधील प्रमुख विनायक गोल्हे आपल्या टीमबरोबर घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळी असलेले सीसीटीव्ही तपासून पाहिले असताना त्यांना व्हिडीओत एक व्यक्ती महिलांच्या वॉशरुमबाहेर व्हिडीओ शूट करताना दिसली. महिलांनी ही व्यक्ती मंगेशच असल्याची ओळख पटवली.

समोर आली धक्कादायक माहिती...

पोलिसांनी तपास सुरु केला असता मंगेश मागील 4 दिवसांपासून या परिसरामध्ये येत होता असं स्पष्ट झालं. तातडीने पोलिसांनी मंगेशला अटक केली. मंगेशचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला. तपासामध्ये मंगेशने मागील 3 दिवसांमध्ये एक डझनहून अधिक महिलांचे व्हिडीओ शूट केले. काही व्हिडीओ त्याने डिलीटही केले. मंगेशविरुद्ध विनयभंग आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचं गोल्हे यांनी सांगितलं. मंगेश हा मानसिक रुग्ण असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केवळ या कार्यक्रमाच्या ठिकाणी नाही तर शहरातील वेगवेगळ्या भागांमधील सार्वजनिक शौचालयांमध्येही त्याने महिलांचे व्हिडीओ बनवल्याची माहिती समोर आली आहे. तो 2022 पासून हे काम करत आहे. त्याच्या मोबाईलमध्ये महिलांचे 25 ते 30 अश्लील व्हिडीओ आढळून आले. अन्य पीडित महिलांनी पोलिसांकडे आपला जबाब नोंदवला आहे. पोलिसांनी मंगळवारी दुपारी मंगेशला अटक केली. मात्र न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला आहे.