VIDEO : तिच्यासाठी दे दणादण! Propose Dayला तुफान राडा

नाशिक जिल्ह्यातल्या निफाडमध्ये प्रपोज डेवरुन विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाली.

Updated: Feb 9, 2022, 02:32 PM IST
VIDEO : तिच्यासाठी दे दणादण! Propose Dayला तुफान राडा  title=

नाशिक : व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day) निमित्ताने विविध डे साजरे केले जातात. मंगळवारी प्रपोज डे (Propose Day) होता. पण या दिवसाला नाशिकमध्ये गालबोट लागलं आहे.  नाशिक जिल्ह्यातल्या निफाडमध्ये प्रपोज डेवरुन विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाली. पिंपळगाव रोडवरील गणपत मोरे महाविद्यालयाबाहेर विद्यार्थ्यांची तुंबळ हाणामारी झाली. 

महाविद्यालयाबाहेर विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये वाद झाला. यानंतर वादाचं पर्यावसन हाणामारीत झालं. दोन्ही गटातील विद्यार्थ्यांमध्ये अक्षरश: फ्री स्टाईल मारामारी झाली. 

हाणामारीचा व्हिडिओ काही जणांनी मोबाईलमध्ये चित्रित केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. प्रपोज डे वरुन दोन गटात वाद झाल्याचं बोललं जात आहे. पण हाणामारीचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. 

महाविद्यालय प्रशासनाने मात्र या प्रकरणावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे महाविद्यालयातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.