आंबा खाऊन मूल होते; संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य

...

Updated: Jun 11, 2018, 02:29 PM IST

नाशिक: वादग्रस्त विधाने करून खळबळ उडवून देणे संभाजी भिडे यांच्यासाठी नवे नाही. पण, वादग्रस्त विधानांच्या मालिकेत आता त्यांनी भलतेच अवैज्ञानिक विधान केले आहे. आंबा खाऊन मूल होतं, असा अजब शोध संभाजी भिडे यांनी लावला आहे. संभाजी भिडे हे  शिवप्रतिष्ठानचे संस्थापक आहेत.

दरम्यान, संभाजी भिडे हे केवळ एक विधान करून थांबले नाहीत. तर त्यांनी आंब्याच्या माध्यमातून अनेकांना अपत्य प्राप्ती करुन दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे. नाशिक येथील मेळाव्यात ते बोलत होते. मूल होत नसेल तर आंबा खाऊन मूल होते. इतकेच नाही तर केवळ मुलगाच हवा असेल तर तेही शक्य करून दाखविले आहे. तसेच, अनेक दाम्पत्याला मुलगा मिळवून दिला  असल्याचा दावाही संभाजी भिडे यांनी नाशिकच्या मेळाव्यात केला आहे. 

दरम्यान, संभाजी भिडे असा कोणता आंबा ते खाऊ घालतात आणि हा चमत्कार होतो याबाबत तुम्हालाही उत्सुकता असेल. तर ऐका त्यांच्याच तोंडून. आंब्याची कहाणी जाणून घेण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.