पनवेलमधील सिडको क्षेत्रात परिवहन सेवा देण्यास चालक-वाहकांचा नकार

पनवेल परिसरातल्या सिडको क्षेत्रात परिवहन सेवा न पुरवण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिका घेण्याची शक्यता आहे.

Updated: Dec 17, 2017, 08:58 PM IST
पनवेलमधील सिडको क्षेत्रात परिवहन सेवा देण्यास चालक-वाहकांचा नकार  title=

नवी मुंबई : पनवेल परिसरातल्या सिडको क्षेत्रात परिवहन सेवा न पुरवण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिका घेण्याची शक्यता आहे.

सिडकोकडून कोणतीच सुविधा पुरवली जात नसल्यानं, एनएमएमटीच्या कर्मचा-यांनी तिथं सुविधा पुरवायला नकार दर्शवलाय. 

नवी मुंबई महापालिकेची हद्द वगळता सिडकोच्या पनवेल, उरण, तळोजा, उलवे, कळंबोली आणि खारघर इथल्या प्रवाश्यांना एसटी आणि एनएमएमटी बसवरच अवलंबून रहावं लागतं. 

झपाट्याने विकसीत होणा-या या भागांत १५ मार्गांवर एनएमएमटीच्या १०० गाड्यांमधून दररोज जवळपास १ लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात. मागील ५ ते ६ वर्षांपासून मागणी करुनही सिडकोकडून या ठिकाणी बस चालक-वाहकांसाठी आवश्यक सुविधा पुरवल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे आता सिडको हद्दीत बसच चालवणार नसल्याचं वाहन चालकांनी सांगितलंय.

सिडको क्षेत्रात परिवहन सेवा देण्यास चालक-वाहकांचा नकार