गडचिरोलीत नक्षली कारवाया सुरुच, दोन जवान जखमी

जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशीही नक्षली कारवाया सुरुच असून नक्षवाद्यांच्या हिसेंत दोन जवान जखमी झाले आहेत. कोरची तालुक्यातील कोटगुल जंगलात नक्षलविरोधी पायी पोलीस पथकाला लक्ष्य करण्यात आलंय. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 25, 2017, 12:02 AM IST
गडचिरोलीत नक्षली कारवाया सुरुच, दोन जवान जखमी title=

गडचिरोली : जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशीही नक्षली कारवाया सुरुच असून नक्षवाद्यांच्या हिसेंत दोन जवान जखमी झाले आहेत. कोरची तालुक्यातील कोटगुल जंगलात नक्षलविरोधी पायी पोलीस पथकाला लक्ष्य करण्यात आलंय. 

नक्षवाद्यांकडून भूसुरुंग

सोमपूरनजीक नक्षवाद्यांनी भूसुरुंगात घडवून आणला त्यात दोन जवान जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर घटनास्थळाकडे अधिक सुरक्षा दलं रवाना करण्यात आली आहेत. गेल्या तीन दिवसांमध्ये नक्षलवाद्यांनी चार ग्रामस्थांची हत्या केलीय. 

नक्षलवादी पुन्हा एकदा सक्रिय

गडचिरोलीत पोलीस महानिरीक्षकांनी गडचिरोलीत नक्षली कारवाया थंडावल्याची पत्रकार परिषदात घेतल्यावर नक्षलवादी पुन्हा एकदा सक्रिय झाले असू सलग चार दिवस ते हिंसा घडवत आहेत.