...जेव्हा शरद पवार स्वत: उभं राहून तालुकाध्यक्षाला खुर्चीवर बसवतात!

 मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP Sharad Pawar) अध्यक्ष शरद पवार अनेक ठिकाणचे दौरे करताना दिसत आहेत. सोमवारी शरद पवार पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर होते.

Updated: Oct 26, 2022, 08:00 PM IST
...जेव्हा शरद पवार स्वत: उभं राहून तालुकाध्यक्षाला खुर्चीवर बसवतात! title=

Sharad Pawar : मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP Sharad Pawar) अध्यक्ष शरद पवार अनेक ठिकाणचे दौरे करताना दिसत आहेत. सोमवारी शरद पवार पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. परिंचे येथे शेतकरी मेळावा झाला. त्याठिकाणी देखील पवारांनी उपस्थिती लावली होती. त्यानंतर एका जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनसाठी शरद पवार यांना आग्रह करण्यात आला होता. त्यावेळी शरद पवार यांचा साधेपणा दिसून आला आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुरंदर (Purandar) तालुकाध्यक्ष पुष्कराज जाधव (Pushkraj Jadhav) शरद पवार यांना जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी घेऊन आले. त्यावेळी त्यांनी शरद पवार यांना आपल्या खुर्चीवर बसण्याची विनंती केली. मात्र, शरद पवारांनी त्यावेळी खुर्चीवर न बसता तालुकाध्यक्षांना मान दिला. शरद पवारांनी स्वत: उभं राहून तालुकाध्यक्ष जाधव यांना खुर्चीवर बसवलं.

आणखी वाचा - पुण्यातील माजी आमदाराचं हृदयविकाराच्या झटक्याने दुख:द निधन!

ऑफिस तुमचं, खुर्ची तुमची...असं म्हणत शरद पवारांनी जाधव यांच्या हाताला धरून त्यांना खुर्चीवर बसवलं. त्यावेळी पुष्कराज जाधव काहीसे लाजल्याचं देखील पहायला मिळालंय. शरद पवारांनी दिलेला आदर पाहून जाधव काहीसे भावूक देखील झाले होते. आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी साक्षात माझ्या विठ्ठलाचे दर्शन झालं, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी हा व्हिडीओ शेअर केलाय.

पाहा व्हिडीओ - 

काय म्हणाले मेहबूब शेख ?

पुरंदर तालुक्याचे युवक अध्यक्ष पुष्कराज जाधव हे आदरणीय श्री.शरद पवार साहेब यांना कार्यालय भेटीला घेऊन आले! व खुर्चीवर बसण्याची विनंती केली. साहेब म्हणाले 'ऑफिस तुमचं, खुर्ची तुमची' स्वतः ऊभे राहिले व त्यांना स्वतः सन्मानाने बसवले. पदाधिकाऱ्यांचा हा सन्मान फक्त साहेबच करू शकतात, असं मेहबूब शेख म्हणाले आहे.