हिजड्यांना मुल होतील पण जलसिंचन पूर्ण झालं नसतं- गडकरींचं वादग्रस्त वक्तव्य

सांगलीत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी वादग्रस्त विधान केलंय.

Updated: Dec 23, 2018, 07:04 PM IST
हिजड्यांना मुल होतील पण जलसिंचन पूर्ण झालं नसतं- गडकरींचं वादग्रस्त वक्तव्य  title=

सांगली : सांगलीत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी वादग्रस्त विधान केलंय. हिजड्यांना मुल होतील पणं जलसंचन पूर्ण झालं नसतं असं वक्तव्य त्यांनी सांगलीत झालेल्या शेतकरी मेळाव्यात केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचा सोशल मीडियात चांगला समाचार घेतला जातोय. गडकरी हे आपल्या कामातील हजरजबाबीपणा आणि स्पष्ट बोलण्यासाठी ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यानंतर आता भाजपाकडूनही सारवासारव केली जात आहे.

शेतकऱ्यांना फायदा  

 टेंभू सिंचन योजना पूर्ण होण्यास खूप अडथळे येत होते. ती पूर्ण होईल असं कोणी ठामपणे सांगू शकत नव्हत. पण भाजपाच्या काळात ही योजना पूर्ण झाली. या योजनेमुळे शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे. हे पटवून देताना गडकरींच्या जीभेचा तोल घसरला. पण त्यानंतर त्यांनी त्याचे स्पष्टीकरणही दिले आहे. 

गडकरींचं स्पष्टीकरण 

 'एकवेळ हिजड्यासोबत लग्न केलं असतं तरी मुलं झाली असती, मात्र सांगलीतल्या जलसिंचन योजना पूर्ण झाल्या नसत्या असं आपलं मत होतं असं गडकरींनी म्हटलंय. या सगळ्या रखडलेल्या योजना भाजपा सरकारने पूर्ण केल्याचं गडकरींनी सांगितलंय.