इक्बाल कासकर विरोधात आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल

इक्बाल कासकरविरोधात आणखी एक गुन्हा दाखल झालाय. 

Updated: Oct 4, 2017, 09:14 PM IST
इक्बाल कासकर विरोधात आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल  title=

ठाणे : इक्बाल कासकरविरोधात आणखी एक गुन्हा दाखल झालाय. 

ठाणे नगर पोलीस स्टेशनमध्ये हा तिसरा गुन्हा दाखल करण्यात आलाय. कासकरसह दाऊद इब्राहिम, अनिस इब्राहिम विरोधातही गुन्हा दाखल झालाय. या तिघांविरोधात खंडणीचा हा आणखी एक गुन्हा दाखल झालाय.

मंगळवारीसुद्धा कासकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गोराई इथल्या ३८ एकर जमिनीच्या व्यवहारात हस्तक्षेप करीत इकबालने तीन कोटींची खंडणी जमीन मालकाकडून उकळल्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. 

दरम्यान, एका ज्वेलर्सकडून १५ लाखाची खंडणी उकळल्या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात यापूर्वी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात इक्बालला खंडणीविरोधी पथकाने पुन्हा पोलीस कोठडीत घेतले असून इतर गुन्ह्यांचा तपास सुरु आहे.