नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या भावात वाढ

इतर राज्यातून मागणी वाढल्याने बुधवारी दुपारच्या सत्रात कांद्याच्या भावात अचानक वाढ झाली आहे.

Updated: Aug 3, 2017, 08:53 PM IST
नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या भावात वाढ title=

नाशिक : नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या भावात वाढ झाली आहे.  लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या भावात 371 रुपयांची वाढ झाली आहे.  

इतर राज्यातून मागणी वाढल्याने बुधवारी दुपारच्या सत्रात कांद्याच्या भावात अचानक वाढ झाली आहे.

जास्तीतजास्त 1872 प्रति क्विंटल, सरासरी 1650 तर कमीतकमी 600 रुपये प्रति क्विंटला भाव मिळाला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतक-यांना दिलासा मिळाला आहे.