कांद्याचे भाव आणखी वाढले पाहीजे - बच्चू कडू

 'कांद्याचे भाव वाढत राहले पहिजेत'

Updated: Oct 21, 2020, 08:43 PM IST
कांद्याचे भाव आणखी वाढले पाहीजे - बच्चू कडू title=

अमरावती : एकीकडे कांद्याचे भाव ६० रुपयांवर गेल्याने सर्वसामान्यांमध्ये कुजबुज वाढत असली तरी कांद्याच्या दरवाढीचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी समर्थन केल आहे. कांद्याचे भाव समाधानकारक असले तरी सर्वसामान्य लोकांनी कांद्याचे भाव वाढले म्हणून ओरडू नका असे आवाहन बच्चू कडु यांनी केलंय. कांद्याचे भाव आणखी वाढले पाहीजे कारण मागील सत्तर वर्षात कांदा उत्पादक शेतकरी लुटला गेलाय असंही ते पुढे म्हणाले.

जर कुणाला कांदा जास्तच आवडत असेल पण त्याला भाव जास्त वाटत असेल तर त्यांनी लसूण खा, मुळा खा... पण कांदा महाग झाला म्हणून ओरडू नका असा सल्ला बच्चू कडु यांनी दिलाय. 

यावर्षी कांदा काढणीच्या वेळेला अवकाळी पाऊस आल्याचे कांदा उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे आता कांद्याचे भाव ६० रुपयांवर गेल्याने  सर्वसामान्यांची धांदल उडालीय. परंतु कांद्याचे भाव वाढले म्हणणाऱ्यांना बच्चू कडू यांनी खडे बोल सुनावले आहेत. 

दरम्यान बच्चू कडू यांनी माध्यमांना देखील टोले लगावले आहेत. आता भाव वाढले तर लगेच तुम्ही स्वयंपाक खोलीत कॅमेरा घेऊन जात आणि गृहीणीच्या डोळ्यात पाणी आलं असं दाखवाल असे ते म्हणाले. तुम्ही असं करू नका, कांदा खाल्ला नाही तर कुणी मरत नाही पण त्याचे भाव वाढले नाही तर शेतकरी मरतो. म्हणून असेच कांद्याचे भाव वाढत राहले पहिजेत असे राज्यमंत्री बच्चू म्हणाले.