एकट्याची ताकद जगाला दाखवून द्यावी लागेल; पंकजा मुंडे यांच्या मानात नेमकं काय?

Maharashtra politics :  बीड लोकसभा मतदारसंघावरुन पंकजा मुंडेंनी मोठं विधान केले आहे. पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. 

Updated: Feb 22, 2024, 08:53 PM IST
एकट्याची ताकद जगाला दाखवून द्यावी लागेल; पंकजा मुंडे यांच्या मानात नेमकं काय?     title=

Pankaja Munde : बीड लोकसभा मतदारसंघावरुन पंकजा मुंडेंनी मोठं विधान केले आहे. बीड लोकसभेचा निर्णय भाजप पक्षश्रेष्ठी घेतील असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केले आहे. बीडची लोकसभेची जागा प्रीतम मुंडेच लढतील अशी भूमिका पंकजा मुंडेंनी याआधी घेतली होती. मात्र,  आता पंकजांनी वरिष्ठांवर हा निर्णय सोपवला आहे. पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आष्टीमध्ये बूथप्रमुखांच्या संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर त्या बोलत होत्या.

पंकजा मुंडे या बीडची लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सध्या सुरू असून यावरच पंकजा मुंडे यांना विचारला असता बीडची लोकसभा नेमकं कोण लढवणार हे पक्षातले श्रेष्ठ लोक ठरवतील असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. आष्टी मध्ये पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची संवाद बैठक घेण्यात आली आणि या बैठकीनंतर पंकजा मुंडे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या बूथ रचना केली जात आहे आणि या कामाला कार्यकर्त्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पंकजा मुंडे म्हणाले आहेत 2014 आणि 19 मध्ये याच कार्यकर्त्यांनी माझ्या बाजूने चांगलं काम केलं होतं त्यामुळे उमेदवार कोण असेल हे येणाऱ्या काळात निश्चित होईल अस पंकजा मुंडे म्हणाल्या. 

राजकारणात येणाऱ्या महिलांसाठी येणारा काळ चांगला आहे. कारण येत्या काळात महिलाच या स्पष्ट आणि सत्याचा राजकारण करतील असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. तर येणाऱ्या काळात एकट्याची ताकद जगाला दाखवून द्यावी लागेल अस देखील पंकजा मुंडे म्हणाल्या. यामुळे आता पंकजा मुंडे पुढची राजकीय भूमिका काय असेल याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

कोणत्याही आरक्षणाच्या आंदोलनाचा निवडणुकांवर धोकादायक परिणाम होणार नाही

राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न पेटलेला आहे आणि याचा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर पाहिजे तेवढ्या प्रमाणात धोकादायक परिणाम होणार नाही अस पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. राज्य सरकारने मराठा समाजाला जे आरक्षण दिलं आहे ते आरक्षणाचा मराठा समाजाने विरोध केला आहे यावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की मराठा समाजाने ठरवावे किती आरक्षण हवं आहे की नाही यावर अनेकदा मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे असं म्हणत त्यांनी यावर भाष्य करण टाळलं.

महायुतीकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर

महायुतीकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलीय. अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णीं आणि नांदेडच्या अजित गोपछडेंना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. तर शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आलीय. भाजपनं अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडेंचं नाव जाहीर केल्यानं नारायण राणे आणि पंकजा मुंडेंचा पत्ता कट झाल्याचं स्पष्ट होतंय. नारायण राणेंना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.