बीड जिल्ह्यातील गुंडगिरी संपवली - पंकजा मुंडे

गोपीनाथ मुंडे गृहमंत्री असताना त्यांनी मुंबईतील गुंडगिरी आणि गँगवार संपवलं.ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचा टोला.

Updated: Dec 12, 2018, 06:40 PM IST
बीड जिल्ह्यातील गुंडगिरी संपवली - पंकजा मुंडे title=
Pic : PankajaGopinathMunde @ twitter

बीड : गोपीनाथ मुंडे गृहमंत्री असताना त्यांनी मुंबईतील गुंडगिरी आणि गँगवार संपवलं. त्याप्रमाणेच आपण बीड जिल्ह्यातील गुंडगिरी संपवल्याचे सांगत त्यांनी राष्ट्रवादीला अर्थात भाऊ धनंजय मुंडे यांना नाव न घेता ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी टोला लगावलाय.

'जिल्ह्यासाठी का होईना गृहमंत्री आहोत'

आमदार सुरेश धस यांच्या भाषणाचा धागा पकडत पंकजा यांनी मी बीड जिल्ह्यातील दहशत, दादागिरी,गुंडगिरी संपवली आहे. यापुढे कोणालाही घाबरण्याची गरज नाही. चांगले काम करा आणि माझ्या पाठीशी राहा असे आवाहन केले. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराच्या उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.दरम्यान, पंकजा मुंडे यांनी यापूर्वीही अनेकदा आपल्याला गृहमंत्री पद आवडत असल्याचे म्हटले होते. आज आपण जिल्ह्यासाठी का होईना गृहमंत्री असल्याचे सांगून त्यांनी आपली या पदाबद्दलची सुप्त इच्छा बोलून दाखवली.

हुरळून जाऊ नका, विजय आमचाच आहे !

पाच राज्याच्या निवडणुकीच्या निकालानंतर काही जण हुरळून गेलेत, मात्र हा पराभव नसून विजयच आहे, असा दावा पंकजा मुंडे यांनी केलाय. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपाचीच सत्ता येणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. 

आगामी निवडणुकीत भाजपचाच विजय

पंकजा मुंडे यांनी यावेळी राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड  राज्यातील निकालांबाबत भाष्य केले. परळीतल्या गोपीनाथ गड येथे आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरात त्या बोलत होत्या. या राज्यात चार टर्मपासून भाजपची सत्ता होती. त्यामुळे मोठा पराभव होईल, असे म्हटले जात होते. मात्र दोन चार जागांचा फरक राहिला त्यामुळे हा आमच्यासाठी विजयच आहे. असे त्या म्हणाल्या. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पुन्हा भाजपचं विजयी होणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला