Petrol-Diesel Price : आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेल महाग, पाहा तुमच्या शहरातील आजचे दर

Petrol Diesel Price Today in Marathi: आजपासून  आर्थिक वर्ष सुरु झाले असून या वर्षात अनेक नियमात बदल होतात. काही गोष्टींमध्ये महागाई सोसावी लागते तर काहींमध्ये दिलासा मिळतो.  त्यानुसार आज आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले की महाग? ते जाणून घ्या...

श्वेता चव्हाण | Updated: Apr 1, 2024, 10:08 AM IST
Petrol-Diesel Price : आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेल महाग, पाहा तुमच्या शहरातील आजचे दर  title=

1st April Petrol Diesel Rate : आजपासून आर्थिक वर्षाला सुरुवात झाली असून काही नियमात देखील बदल करण्यात आला. जसे की, एलपीजी गॅस सिलेंडरचे दर, टॅक्स नियमात बदल, फास्टॅग यांसारख्या नियमात बदल करण्यात आले. यंदा एलपीजी गॅस दरवाढीपासून सर्वसाम्यांना दिलासा मिळाला आहे. तर इतर गोष्टींमध्ये मात्र महागाईच्या झळा सोसावे लागणार आहे.  तर दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ही काहीसा बदल दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किचिंत बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या दरात चढ-उतार होत असून सरकारी कंपन्यांनी आज म्हणजेच 1 एप्रिल 2024 साठी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाहीर केल्या आहेत. आज देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले आहेत. तसेच आज WTI क्रूड प्रति बॅरल $ 83.17 वर विकले जाणार आहेत. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $86.97 वर व्यापार करत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2 रुपयांनी कपात केल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिलासा मिळाला आहे. मात्र आज (1st April) महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेल महाग झाले आहे. आज महाराष्ट्रात पेट्रोल 65 पैशांनी तर डिझेल 63 पैशांनी महाग झाले आहे. तर मध्य प्रदेशात पेट्रोल 31 पैसे तर डिझेल 28 पैसे महागले आहे. हिमाचल प्रदेशात पेट्रोल 23 पैसे तर डिझेल 22 पैशांनी महागले. 

महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेलचे दर

आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत आज पेट्रोल दर प्रतिलिटर 104.21 रुपये तर डिझेलचा दर 92.15 रुपये प्रतिलिटरने विकले जाणार आहे. तर पुण्यात पेट्रोलचा दर 103.83 रुपये तर डिझेलचा दर 90.37 रुपये आहे. आज नाशिकमध्ये पेट्रोल 104.91 रुपये प्रतिलिटरने विकले जात आहे. डिझेलचे दर 91. ते 41 रुपये प्रति लिटर आहे. नागपुरात पेट्रोलचा दर 103.98 रुपये तर डिझेलचा दर 90.54 रुपये प्रतिलिटर आहे. छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल 106. ते 78 रुपयांना विकले गेले असते. डिझेल 90.54 रुपये प्रति लीटर दराने उपलब्ध आहे. त्याचबरोबर आज नवी दिल्लीत पेट्रोलचा दर 94.72 रुपये प्रतिलिटर आहे. डिझेलचा दर 87.62 रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 103.94 रुपये आणि डिझेलचा दर 90.76 रुपये आहे. त्याच वेळी, चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 100.75 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 92.34 रुपये प्रति लिटर आहे.