पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांची पाण्याची चिंता मिटली

पवना धरण १०० टक्के भरलं

Updated: Aug 12, 2018, 04:57 PM IST
पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांची पाण्याची चिंता मिटली title=

पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवडकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण १०० टक्के भरलं आहे. शनिवारी १० वाजण्याच्या सुमारास धरणाचे चार दरवाजे उघडून १५०० क्युसेकसने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरु करण्यात आला. शुक्रवारी दुपारी एक च्या सुमारास ८०० क्युसेसने पाणी सोडण्यात आले होते. पण परिसरात रात्रभर पावसाची रिमझिम जोर धरु लागल्याने शनिवारी दुपारी चारच्या सुमारास २२०८ क्युसेसने पाणी सोडण्यात आले.

पवना धरणातून पिंपरी चिंचवडसह तळेगाव, देहूरोड, वाघोली प्रकल्प यांनाही पाणी पुरवठा होतो. शेतीसाठी देखील पवना नदीतील पाण्याचा उपयोग होतो. पावसाळ्यातील चार महिने पावसाचे पाणी पवना नदीतून घेतले जाते. उर्वरित आठ महिने पवना धरणातून पाणी सोडले जाते. गेल्या आठ दिवसापासून सध्या धरण परिसरात 20 ते 30 मिलिमीटर पाऊस पडत आहे. त्यानंतर धरण पूर्ण भरल्यानंतर आता पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे.