दारूच्या नशेत महिलांच्या डब्यात शिरला, पोलिसाने हटकताच संताप अनावर, नवी मुंबई लोकलमध्ये एकच थरार

Mumbai Local News Today: मुंबई लोकलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. रात्रीच्या वेळी प्रवासात एका व्यक्तीने दारूच्या नशेत पोलिसाला शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 15, 2023, 11:46 AM IST
दारूच्या नशेत महिलांच्या डब्यात शिरला, पोलिसाने हटकताच संताप अनावर, नवी मुंबई लोकलमध्ये एकच थरार title=
Policeman Was Beaten And Abused at navi mumbai local train in ladies coach

Mumbai Local News Update: मुंबई लोकलमध्ये चाललंय काय असा प्रश्व सध्या सर्वसामान्यांना पडला आहे. लोकलमध्ये महिलांच्या सुरक्षिततेवर वारंवार प्रश्न उपस्थित होत आहेत. मुंबई शहर व उपनगरात घडलेल्या घटनांनंतर आता नवी मुंबईतही असाच एक भयानक प्रकार घडला आहे. महिलांच्या डब्यात तैनात असलेल्या पोलिसाला शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना रविवारी घडली आहे. रविवारी रात्री ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. आरोपीहा दारूच्या नशेत असल्याचं समोर आलं आहे. 

पोलीस शिपाई आकाश भारुड हे ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांच्याकडे सध्या लोकल सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली आहे. रविवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास आकाश भारुड हे पनवेल-ठाणे लोकलमध्ये महिलांच्या डब्यांत कार्यरत होते. त्यातवेळी रविवारी रात्री १२च्या सुमासार लोकल जुईनगर रेल्वे स्थानकात आली. त्यानंतर त्याचवेळी आरोपी महिलांच्या डब्यात चढला. आरोपी दारूच्या नशेत होता. भारुड यांच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला हटकले. व पुढील स्टेशन आल्यानंतर त्याला जनरल डब्यात जाण्यास सांगितले. 

भारुडे यांनी हटकल्याचा राग आल्यानंतर आरोपीने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली त्याचबरोबर मारहाण करण्यासही सुरुवात केली. डब्यातील दोन महिलांनी आणि भारुडे यांनी स्वतः त्याला समजवण्याचा प्रयत्न केला तरीही त्याने मारहाण सुरुच ठेवली. दारुच्या नशेत असलेल्या आरोपीने डब्यातील महिलांसोबत असभ्य वर्तन देखील केले.

दरम्यान, लोकल कोपरखैरणे रेल्वे स्थानकात आल्यानंतर महिलांच्या डब्याशेजारी असलेल्या जनरल डब्यातील दोन प्रावसी भारुड यांच्या मदतीसाठी आले. त्यांनी आरोपीला समजवण्याचा आणि अडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने त्यांचेही ऐकले नाही. कित्येत वेळ लोकलमध्येच हा हाय व्हॉल्टेज ड्रामा सुरु होता. अखेर लोकल ठाणे रेल्वे स्थानकात आल्यानंतरच हा ड्रामा संपला. 

लोकल ठाणे रेल्वे स्थानकात आल्यानंतर इतर प्रवाशांच्या मदतीने भारुडे यांनी आरोपीला ठाणे रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाईसाठी वाशी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. 
 
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सीएसएमटीहून सुटलेल्या लोकलमध्ये मशिद बंदर स्टेशनपर्यंत एका युवतीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या घटनेला उलटून काही दिवस होत नाहीत तर पश्चिम रेल्वेवरील ग्रॅन्ट रोडजवळ धावत्या लोकलमध्ये एका तरुणाने 24 वर्षीय तरुणीची छेड काढण्याचा प्रयत्न केला गेला.