Pune Crime: पुण्यात पुन्हा कोयता गॅंगची दहशत, भरवस्तीत दोघांवर जीवघेणा हल्ला

Pune Crime: सध्या पुण्यातही अनेक तऱ्हेच्या गुन्हेगारीचं प्रमाण वाढू लागलं आहे. पुण्यात कोयत्यानं हाणामारी करण्याच्या घटनाही दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. पुण्यासारख्या ठिकाणी रोड रोमिया, गॅंग, टोळ्या आणि मवालीपणाच्या घटना घडू लागल्या आहेत.

Updated: Dec 24, 2022, 08:10 PM IST
Pune Crime: पुण्यात पुन्हा कोयता गॅंगची दहशत, भरवस्तीत दोघांवर जीवघेणा हल्ला title=
pune

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे: सध्या पुण्यातही अनेक तऱ्हेच्या गुन्हेगारीचं प्रमाण वाढू लागलं आहे. पुण्यात कोयत्यानं हाणामारी करण्याच्या घटनाही दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. पुण्यासारख्या ठिकाणी रोड रोमिया, गॅंग, टोळ्या आणि मवालीपणाच्या घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे अशा परिसरात लोकांमध्ये भीतीचे आणि संतापाचा वातावरण वाढू लागले आहे. नुकतीच समोर आलेली घटना देखील हादरवून टाकणारी आहे. हडपसर, सिंहगड, खडकी या परिसरात कोयता गँगने दहशत (Koyta Gang) पसरवण्याच्या घटना ताज्या असतानाच पुण्याच्या भरवस्तीत देखील असाच प्रकार पुन्हा एकदा घडला आहे. सध्या या प्रकारानं पुणे हादरलं असून अशा टोळक्यांवर कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. खडक पोलीस स्टेशनच्या (Pune Crime News) हद्दीतील घोरपडे पेठेत 7 ते 8 जणांच्या टोळक्याने पाठलाग करून दोघांवर कोयत्याने वार केले. या घटनेत दोघे गंभीर जखमी झाले आहेत. 22 डिसेंबर रोजी हा प्रकार घडला असून या प्रकारानं नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. (pune news a group of young boys attacks citizens with sickle)

कोण आहे ही कोयता गॅंग? 

फिर्यादी हे मित्रांसोबत घोरपडे पेठेत थांबले होते. आरोपी योगेश चव्हाण यांनी त्यांना शिवीगाळ करत तुम्ही बघेल तेव्हा कॉलनीत का येता असा जाब विचारला. त्यावेळी फिर्यादी यांनी ''तू कोण विचारणारा'', असे म्हणाल्याने दोघात वाद झाले. ''तू कॉलनीमध्ये आला आहेस, पण परत जिवंत जाणार नाहीस'', असे म्हणून तो निघून गेला. त्यानंतर तीन दुचाकीवरून बाईक वरून (Bike) आपल्या मित्रांना घेऊन आला आणि कोयत्याने फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

फिर्यादी हे घोरपडे पेठेतून जीवाच्या आकांताने पळत होते. आरोपी त्यांना मारण्यासाठी हातात कोयते आणि शस्त्र घेऊन त्यांचा पाठलाग करत होते. जीव वाचवण्यासाठी फिर्यादी एका बिल्डिंगमध्ये लपून बसले. आरोपींनी त्या ठिकाणीही जाऊन ''तुला आज जिवंत ठेवणार नाही'', असे बोलून कोयत्याने त्यांच्यावर वार केले तर दुसऱ्या एका आरोपीने त्यांच्या पोटात चाकू खुपसला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून चौघांना अटक केली आहे. सध्या या प्रकारानं आजूबाजूच्या परिसरात खळबळ माजली आहे. सध्या अशाच काही घटना पुण्यात वाढू  लागल्या आहेत. काही दिवसांपुर्वीच सिंहगड येथे एका मुलानं दादागिरी करत पिस्तूल दाखवत फुकट काजूकतली खाण्याचा प्रयत्न केला होता.  

योगेश दत्तात्रय चव्हाण (वय 38), सुरज संतोष कोल्हे (वय 19), मुकेश इंद्रजीत उंबरे (वय 19), विशाल अंकुश मुजमुले (वय 19) यांच्यासह आणखी तिघांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओमकार महेश थोरात (वय 22) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.